एमपीएससी परीक्षा घोटाळा - तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती, संभ्रम दूर !
सोमवार, 12 अक्टूबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि विविध अनियमिततेच्या आरोपांनंतर राज्य सरकारने मोठा प्रशासकीय बदल करत १ ऑक्टोबर २०२६ रोजी एमपीएससीचे तत्कालीन सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता.
या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून एमपीएससीच्या संपूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी करण्यात येत होती.विद्यार्थ्यांच्या या वाढत्या दबावानंतर आणि आक्रमक भूमिकेनंतर, राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेतील कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे आणि कर्तव्यकठोर अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या या नियुक्तीनंतर सोशल मीडियावर आणि विद्यार्थी वर्गात ते MPSC चे नवीन नियमित सचिव झाले आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, यात स्पष्टपणे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुकाराम मुंढे यांची थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियमित सचिवपदी नियुक्ती झालेली नाही. एमपीएससीचे नियमित सचिवपद आणि एमपीएससीच्या कामकाजाची अनियमितता तपासणाऱ्या या विशेष चौकशी समितीचे सचिवपद ही दोन पूर्णपणे वेगळी पदे आहेत. राज्य सरकारने केवळ एमपीएससीच्या कारभाराची
चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष समितीच्या सचिवपदाची घुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवली आहे. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा उंचावल्या गेल्या काही काळापासून एमपीएससी पारदर्शकतेबाबत परीक्षांमधील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. पेपरफुटी आणि चुकीच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी मोठे लढे उभारले होते. अशातच, प्रशासकीय पातळीवर अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीच्या सचिवपदी वर्णी लागल्यामुळे, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि दूध का दूध, पाणी का पाणी करणारी चौकशी होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीच्या माध्यमातून आता एमपीएससीच्या कारभारातील अनियमिततेचा बुरखा फाटणार का आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षार्थीचे लक्ष लागून राहिले आहे..हे त्यांची 26 वी जवाबदारी असून एमपीएससी परीक्षेचा पेपर फुटीचा घोटाळा बाहेर येऊ शकेल का?.पेपर फुटी करणाऱ्या टोळीवर व अधिकाऱ्यांवर धाक दुखी चे वीष पसरले असून स्पर्धकात कुठ हुल निर्माण झाले आहे.
0 Response to "एमपीएससी परीक्षा घोटाळा - तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती, संभ्रम दूर !"
एक टिप्पणी भेजें