अड्याळ येथे धम्मदेसना व चिवरदान कार्यक्रम संपन्न
मंगलवार, 27 अक्टूबर 2026
Comment
• वाट फ्रा धम्मकाया टेम्पल थायलंडचा उपक्रम
संजीव भांबोरे साप्ताहिक
"जनता की आवाज़"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ नगरीमध्ये वाट फ्रा धम्मकाया टेम्पल थायलंडच्या वतीने अड्याळ नगरीमध्ये थायलंड येथील भिक्खू संघाचा धम्मदेसना, व चिवरदान कार्यक्रम संगम ,समता नगर बाजार पेठे येथे घेण्यात आला. यावेळी गावातील प्रमुख मार्गाने भव्य धम्म रॅली थायलंड येथील भिक्खू संघाच्यावतीने प्रमुख उपस्थितीत व बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत भव्य धम्म रॅली अड्याळ बस स्टॉप पासून ते वैशाली बौद्ध विहार पर्यंत काढण्यात आली.
यावेळी बऱ्याच बौद्ध ,उपासक उपासीका यांनी थायलंड येथील भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता भिक्खूनी सुप्रिया( संगमित्रा तिरपुडे), समाधान तिरपुडे, मुनिश्वर बोदलकर, पंकज वानखेडे, संजीव भांबोरे, विकास टेंभुर्णे, मयूर खोब्रागडे व सर्व बुद्ध उपासक उपासिका यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व उपस्थितांना भोजनदान देण्यात आले.
0 Response to "अड्याळ येथे धम्मदेसना व चिवरदान कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें