युवराज रामटेके यांची नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती.
मंगलवार, 13 अक्टूबर 2026
Comment
• बारमाही रोजंदारी वनमजूर कामगार संघटनेची जबाबदारी.
युगांतर बारसागडे
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर युवराज रामटेके यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या बारमाही रोजंदारी वनमजूर कामगार संघटनेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महासंघाचे राज्याध्यक्ष प्राचार्य म. ना. कांबळे यांनी ही नियुक्ती केली.युवराज रामटेके यांनी अनेक वर्षांपासून वन विभागातील रोजंदारी मजुरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वन विभागातील अनेक रोजंदारी मजुरांना कायमस्वरूपी
नियुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर नागपूर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवराज रामटेके हे मागील अनेक वर्षापासून वन कामगारांच्या हक्कासाठी लढत आहेत.
व या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर सह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील वन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे.
या नियुक्तीमुळे वन विभागातील बारमाही रोजंदारी मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी रामटेके यांना नव्या व्यासपीठावरून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. युवराज रामटेके यांच्या नियुक्तीबद्दल हंसराज वैद्य, अतिश बागडे, मनोज खोब्रागडे, युगेंद्र बारसागडे, हेमराज दहिवले, महेश महाजन, रजनी वैद्य, विजय मेहर, अमोल गजभिये, दिनेश वासनिक, अचल मेश्राम, विलास मेश्राम आदींनी अभिनंदन केले आहे.
0 Response to "युवराज रामटेके यांची नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें