-->
ऐन सणासुदीत एलपीजी सिलेंडर बासष्ठ रुपयांनी महागला.

ऐन सणासुदीत एलपीजी सिलेंडर बासष्ठ रुपयांनी महागला.


साप्ताहिक "जनता की आवाज" 
न्यूज नेटवर्क 

न्यू दिल्ली :- नवा महिना सुरू झाला आणि सर्वसामान्यांना पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला. ऑक्टोबरच्या पहिल्याच सकाळीच दिवसाच्या महागाईची फोडणी बसलीय. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑक्टोबर 2026 च्या सकाळी एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये बदल केले असून नव्या किंमती जारी केल्या आहेत.
काही नवरात्रौत्सवाच्या दिवसांवरच आला असताना हा महागाईचा झटका अनेकांचं बजेट कोलमडवणारा ठरतोय. दरम्यान, तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी

सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ केली असून तब्बल 62.50 रुपयांनी दर वाढवले आहेत. तर, घरगुती सिलेंजर्सच्या किंमती मात्र, स्थिर ठेवण्यात आल्यात.

दिल्लीत 19 किलोंच्या सिलेंडरचे दर काय?.

1 ऑक्टोबर 2026 पासून ऑईल मार्केटिंग कंपन्यांद्वारे वाढवण्यात आलेले कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींवर नजर टाकली, तर राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोंचा सिलेंडरचे दर 62.50 रुपयांनी वाढून आता 2 हजार 810 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, याआधी गेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 19Kg एलपीजी सिलेंडर किंमतमध्ये वाढ करण्यात आलेली आणि दिल्लीमध्ये सिलेंडर 9.50 रुपयांनी महाग झालेला. आता सणासुदीच्या काळात एलपीजी सिलेंडरच्या महागाईटा झटका अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या महागाईचा झटका थेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांना बसला आहे.

घरगुती सिलेंडर्सचे दर स्थिर..

एकीकडे तेल कंपन्यांनी 19 किलोंच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. यादरम्यान, काहीशी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, 14.2 किलोंचा एलपीजी सिलेंडर जुन्याच दरांमध्ये मिळतोय. 14.2 Kg एलपीजी सिलेंडर किंमतबाबत बोलायचं तर, तर दिल्लीमध्ये 942 रुपये, मुंबईत 941.50 रुपये, कोलकात्यात 968 रुपये आणि चेन्नईमध्ये 957.50 रुपये दर आहेत.

सप्टेंबरमध्ये वाढवण्यात आलेले दर.

कमर्शियल गॅस सिलेंडर्सचे दर यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेले. या दरम्यान, 9.50 रुपयांची वाढ करण्यात आलेली. ज्यामध्ये किमती वाढून 2747.50 रुपयांपर्यंत पोहोचलीय. आता आज 1 ऑक्टोबर 62.50 रुपयांची वाढ झालीय. यानंतर या किंमतींत 2810 रुपयांची वाढ झालीय. दरम्यान, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची पुनर्रचना करतात आणि सकाळी नवे दर जाहीर करतात. अलीकडच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वारंवार चढ-उतार झालेत, ज्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. दुसरीकडे, घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत.

0 Response to "ऐन सणासुदीत एलपीजी सिलेंडर बासष्ठ रुपयांनी महागला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article