दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, बारावीची ६ फेब्रुवारीपासून; राज्य मंडळाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर.
रविवार, 8 नवंबर 2026
Comment
• 6 डिसेंबरपासून विषयनिहाय वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध; प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही निश्चित
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई/नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा ६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या दरम्यान होणार आहे. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक ६ डिसेंबरपासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे परीक्षांच्या तारखांची माहिती दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचेही
वेळापत्रक निश्चित :- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या विद्याथ्यर्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे.
आवाहन :- अधिकृत वेळापत्रकावरच ठेवण्याचे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असेल. विश्वास शाळा
तयारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाईल. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांनी त्यानुसारच परीक्षेची करावी, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच अन्य संकेतस्थळांवर किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. दीपक माळी यांनी केले आहे. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www. mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
0 Response to "दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, बारावीची ६ फेब्रुवारीपासून; राज्य मंडळाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर."
एक टिप्पणी भेजें