-->
जम्बूद्वीप' बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा थाटात सपन्न.

जम्बूद्वीप' बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा थाटात सपन्न.


           उमेश बोरकर 
             जिल्हा प्रति.
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- सम्राट अशोक विजयादशमीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, जांभळी/खांबा यांच्या सौजन्याने १९ व २० ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय धम्ममहोत्सवाचे बुद्धिवर्धक आणि आकर्षक आयोजन करण्यात आले होते.
.            मार्गदर्शन करतानां प्रा.राहुल तागडे

 या महोत्सवात भिक्खुसंघाच्या धम्ममंगलवाणीच्या साक्षीने जांभळी येथील नवनिर्मित ‘जम्बूद्वीप’ बुद्धविहाराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला मूलनिवासी- बहुजन समाजातील ओबीसी, अनुसूचित जाती(एस.सी.), अनुसूचित जमाती(एस.टी.), एन.टी. आणि व्ही.जे. एन.टी.प्रवर्गांसह बहुसंख्य बुद्धप्रेमी नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी मदन रामटेके, जिल्हा परिषद सभापती, भंडारा; दीपलता नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्या; सुशील गणवीर, पंचायत समिती सदस्य; शैलेश गजभिये, लीलाधर पटले, छायाताई पटले, तुलसीदास पटले, गिरीधारी टेंभुर्णे सर, पत्रकार उमेश बोरकर महाराष्ट्र 24 मराठी न्युज, भाऊराव राऊत, कैलास मुंगमोडे, भारत मुंगमोडे, अजय उके, दिनेश कटरे आदी मान्यवरांनी समयोचित भाषणे केली.

महोत्सवादरम्यान बुद्ध-भीम गीतांच्या उत्स्फूर्त आणि विचारप्रवर्तक सादरीकरणाने वातावरण धम्ममय झाले. स्थानिक युवतींच्या नृत्याविष्कारासाठी संगिता मुंगमोडे यांनी केलेल्या नृत्यदिग्दर्शनाने उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच युवा मराठी कवी-गायक स्वप्नील बन्सोड यांच्या संचाने सादर केलेल्या ‘एक रात्र बा भीमाची’ या आंबेडकरी ऑर्केस्ट्राने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक धम्मानुयायी सुशील गणवीर यांनी केले, तर देवानंद इलमकर यांनी आभार मानले. दोन दिवसीय धम्ममहोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, जांभळीचे सर्व सदस्य, समितीचे पदाधिकारी आणि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

 यामध्ये सचिन मेश्राम, रुपेश तागडे, प्राण रंगारी, आकाश कांबळे, आशीर्वाद वैद्य, राजाभाऊ गणवीर, मंगेश गेडाम, संतोष मेश्राम, अश्विन मेश्राम, राकेश लेदारे आणि मोरेश्वर डोंगरे यांचा समावेश होता. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्यपाल गणवीर, पोलीस पाटील; सुनील मुंगमोडे, राजेश कापगते , सुभाष पंधरे, महेश कोहळे, सी.एम.पुस्तोडे, चंद्रगुप्त झोडे, रुपचंद बोळणे आदींचे महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

0 Response to "जम्बूद्वीप' बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा थाटात सपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article