कविता भिमा तुझी चाले लेखनी.
रविवार, 22 नवंबर 2026
Comment
अंधाराला नष्ट करूनी
भिमा तुझी चाले लेखनी ॥ धु !!
संघ शक्ती ज्याची उच्चाट
हित शत्रुची लावीली वाट
ज्ञान वैभव, सारे जानुनी ॥१॥ भिमा तुझी....
दीन दुबळ्याची उडवूनी सुस्ती,
चातुरवर्णाची जीरवूनी मस्ती
हक्का आम्हा दिले मिळवूनी ॥२॥ भिमा तुझी ...
दारी कपारी, लेखनी शिरली
दुश्मनाला पुरून उरली
आकाश अन् बोले धरणी ॥३॥ भिमा तुझी...
ओझे पाठीशी, उपकाराचे
कसे फिटणार, युगंधराचे
गौतम' घेरे, त्याग पाहुनी ॥४॥
भिमा तुझी
कवि गौतम धोटे
9637708593
0 Response to "कविता भिमा तुझी चाले लेखनी."
एक टिप्पणी भेजें