लोकशाही बचाव, अराजकता हटाव अभियान!.
सोमवार, 2 नवंबर 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ताहिक"जनता की आवाज"
नांदेड :- लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि जनहिताच्या मुद्द्यांसाठी आयोजित ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण साहेब, मराठवाडा प्रभारी सुनीलजी राणे साहेब, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे सर, नांदेड ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नांदेड ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, आमदार तुषार राठोड, आमदार तथा महानगराध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ कोडगे, भाजपा उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीचे रक्षण, जनहिताचा संकल्प आणि संघटित कार्यकर्त्यांची ताकद!
डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर
नांदेड.दक्षिण विधानसभा प्रमुख
0 Response to "लोकशाही बचाव, अराजकता हटाव अभियान!."
एक टिप्पणी भेजें