-->
पहेला येथील प्लॉट धारकांची विवेकानंद लेआउट चे मालक दयानंद नखाते व अजय भागवत यांनी केली फसवणूक.

पहेला येथील प्लॉट धारकांची विवेकानंद लेआउट चे मालक दयानंद नखाते व अजय भागवत यांनी केली फसवणूक.

• न्यायासाठी गळ्यात घेतला फाशीचा फंदा ,न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा.

• घटनास्थळी तहसीलदार व ठाणेदार उपस्थित 

संजीव भांबोरे 
साप्ताहिक"जनता की आवाज"

भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे विवेकानंद लेआउट चे मालक दयानंद नखाते व अजय भागवत यांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी शासनामार्फत जो प्रथम नकाशा तयार करण्यात आला त्या ठिकाणी 44 प्लॉट पाडण्यात आले. त्यानंतर दुसरा नकाशा तयार करून 48 प्लाट ची रजिस्ट्री करून घेतली. त्यानंतर तिसरा नकाशा तयार करून 50 प्लाट ग्रामपंचायतला दाखविले. 
 न्यायासाठी गळ्यात घेत फाशीचा फंदा 

यात विवेकानंद लेआउट बाजूला लागून ग्रामपंचायत रोडची जागा होती ती जागा आपल्या नकाशात दाखवून ग्रामपंचायती सुद्धा फसवणूक केलेली आहे. लेआउट चे रोड सुद्धा विकण्यात आले, ग्राउंड करिता जी मोकळी जागा होती त्यातले सुद्धा प्लॉट विकण्यात आले. त्यामुळे प्लॉटधारकाची फसवणूक करण्यात आली. खऱ्या प्लॉट धारकांना न्याय देण्यात यावा याकरिता त्यांनी आज दिनांक 4 नोव्हेंबर 2026 ला गळ्यात फाशीचा फंदा घेऊन न्यायाची मागणी केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी येथील तहसीलदार, ठाणेदार सचिन तायवाडे, मंडळ अधिकारी अहिर, तलाठी रवींद्र हटवार व प्लॉट धारक सुखदेव नगरे ,शिवा चोले, नामदेव नगरे ,ऋषी चवडे ,बबन भुते ,राजू चवळे,वसंता सार्वे व असंख्य प्लॉट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "पहेला येथील प्लॉट धारकांची विवेकानंद लेआउट चे मालक दयानंद नखाते व अजय भागवत यांनी केली फसवणूक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article