तुमसर नगर परिषदेची घनकचरा निविदा रद्द.
शुक्रवार, 27 नवंबर 2026
Comment
• घनकचरा निविदा गुंडाळली; अटींचा पेच आणि तक्रारींचा दणका अन् कागदपत्रांची अडचण.
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- दि. २७ नोव्हेंबर नगर परिषद तुमसरच्या वतीने दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन निविदेतील अटी व शर्ती स्पर्धा मर्यादित करणाऱ्या आणि संशयास्पद असल्याचा आक्षेप घेत आवाज उठवण्यात आल्यानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने ही निविदा रद्द केल्याचा खुलासा लेखी पत्राद्वारे केला आहे. या निर्णयामुळे निविदा प्रक्रियेतील कथित मनमानीला चाप बसल्याचे बोलले जात आहे.
स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी (जा.क्र. १६८/२६) आणि त्यानंतर दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्मरणपत्राद्वारे (जा.क्र. १८७/२६) जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, नगरपरिषद प्रशासन नागपूर तथा नगरपरिषद तुमसर यांच्याकडे निवेदन सादर केले होते. सदर निविदेमध्ये वार्षिक ₹५ कोटींचा टर्नओव्हर, बँक सॉल्व्हन्सी, ईपीएफ/ईएसआयसी चलन, ४० मेट्रिक टन कचरा संकलनाचा अनुभव, जीएफसी ३-स्टार रेटिंग तसेच विशिष्ट 'हरित महासिटी कॉम्पोस्ट' ब्रँडची सक्ती यांसारख्या कठोर अटी टाकून विशिष्ट कंत्राटदाराला लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता.
या तक्रारींची दखल घेत नगरपरिषद प्रशासन नागपूर विभागाच्या विभागीय सह आयुक्तांनी दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी (पत्र क्र. नपाप्र/१९ (५)/कावि ८३१/२०२६) तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांना निविदा प्रक्रियेबाबत नियमानुसार कार्यवाही करून पारदर्शकता व नियमांचे पालन होत
या निविदा प्रक्रियेत पाच संस्थांनी सहभाग घेतला होता; मात्र केवळ एकाच संस्थेने कागदपत्रांची पूर्तता केली आणि उर्वरित चार संस्थांनी पूर्तता न केल्याने प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या निविदा रद्द करून शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे.
मुख्याधिकारी, नगरपरिषद तुमसर,
जि. भंडारा.
असल्याची खातरजमा करण्याचे तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती निवेदनकर्त्यांना व नागपूर कार्यालयास तात्काळ कळवण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी (क्र. तून/आवि/६१५/२०२६) तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी अमित मेश्राम यांना लेखी पत्र पाठवून, १५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या घनकचरा व्यवस्थापन निविदेतील अटी व शर्तीबाबतच्या आक्षेप अर्ज स्मरणपत्राच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेत स्पर्धा मर्यादित होत असल्याने सदर निविदा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या चौकशी व नव्या निविदेची प्रतीक्षा व
निविदा रद्द झाली असली तरी वादग्रस्त अटी कशा आणि कोणाच्या हितासाठी समाविष्ट करण्यात आल्या, याची सखोल चौकशी होऊन पारदर्शक अटींसह नवी निविदा कधी काढली जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
0 Response to "तुमसर नगर परिषदेची घनकचरा निविदा रद्द."
एक टिप्पणी भेजें