-->
नेत्यांची गुलामी नव्हे, जनतेची सेवा हाच ध्यास! भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.चा विद्यार्थी मिलन सोहळा १५ नोव्हेंबरला.

नेत्यांची गुलामी नव्हे, जनतेची सेवा हाच ध्यास! भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.चा विद्यार्थी मिलन सोहळा १५ नोव्हेंबरला.


      
साप्ताहिक"जनता की आवाज" 
     वुत्तपत्र प्रतिनिधी

लाखनी :- नेत्यांची गुलामी नको, जनतेची सेवा करायची, निस्वार्थ समाजकार्याची ज्योत मनामध्ये पेटवायची, या सेवाभावी विचारांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द. (६० गावं) भंडारा जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेचे कार्य सातत्याने करीत आहे.
              रक्तविर जयेंद्र देशपांडे व इ.कार्यकर्ते.
 
केवळ पदासाठी संघर्ष नव्हे, तर समाजाच्या परिवर्तनासाठी प्रयत्न, सत्ता नाही, स्वार्थ नाही, आमचा ध्यास एकच जनतेची सेवा आणि शिक्षणाचा प्रसार, या विचारधारेतून परिषदेचे कार्य सुरू आहे. रुग्णमित्र बनून गरजू जनतेला आधार देण्यासोबतच बुद्ध-भीमांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक जागृती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी परिषद पुढाकार घेत आहे.

सर्कलचे अध्यक्ष जयेंद्र देशपांडे व त्यांची टीम यांच्या सेवाभावी नेतृत्वाखाली संघटना समाजहिताचे विविध उपक्रम राबवित आहे. बुद्धांच्या मैत्री, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा परिषदेचा प्रयत्न आहे.

याच सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीतून रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ११.३० ते ४ वाजेपर्यंत सम्यक बुद्ध विहार, समताभूमी गुरढा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मिलन सोहळा व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द. ही संस्था मागील ५२ वर्षांपासून सातत्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय योजना, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा तसेच करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे (अध्यक्ष, आंबेडकरवादी बहुजन साहित्य चळवळ) राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निलेश नन्नावरे (संचालक, नेचर फाउंडेशन, नागपूर) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. एन. डी. ढोके (ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, नागपूर), डॉ. मिलिंद नामदेव सूर्यवंशी (कोलकाता) तसेच प्रा. देवेंद्रजी सोनटक्के (आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, नेतृत्वगुण आणि सामाजिक प्रबोधन याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे.

साठ गावांचा एक आवाज, शिक्षणाचा ध्यास, भारतीय बौद्ध परिषद समाजाचा विश्वास! शिक्षणातून समाजसुधारणा, जागृतीतून परिवर्तन आणि बुद्ध-भीमांच्या विचारांतून समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्याचा संकल्प परिषदेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, युवकांनी सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी स्वीकारावी आणि समाजबांधवांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन अध्यक्ष जयेंद्र देशपांडे व भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.च्या वतीने करण्यात आले आहे.

0 Response to "नेत्यांची गुलामी नव्हे, जनतेची सेवा हाच ध्यास! भारतीय बौद्ध परिषद सर्कल कनेरी/द.चा विद्यार्थी मिलन सोहळा १५ नोव्हेंबरला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article