सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, समता प्रस्तापित करण्यासाठी बौद्ध अनु्यायांनी पुढाकार घेणे आवश्यक - डॉ. राजरत्न आंबेडकर.
सोमवार, 2 नवंबर 2026
Comment
• विविध बुद्धविहारांना भेटी; बौद्ध धम्माच्या प्रसाराबाबत मार्गदर्शन.
नरेंद्र मेश्राम
साप्ताहिक"जनता की आवाज़"
भंडारा :- स्थानीय रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथील बौद्ध विहारात दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर हे ३१ ऑक्टोबरला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध बुद्धविहारांना भेटी दिल्या बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासह बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करतांना रमाबाई आंबेडकर वॉर्डातील बौद्ध विहारात डॉ. राजरत्न आंबेडकर बोलले की बौद्ध धर्म एक उन्नतीचा मार्ग आहे.तरी देखील समाजातील लोकांना सुख प्राप्त करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजनीतिक मूल्य जोपासून सामाजिक प्रगतशील कार्य करत असतांना भारतीय बौद्धांची स्वतंत्र आर्थिक चळवळ उभारणे, तसेच बँक, रुग्णालये, विद्यापीठे, प्रसारमाध्यमे, छापखाने आणि विहारांची निर्मिती करने . या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विचार मांडले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु डाॅ.राजरत्न आंबेडकर यांची रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा.येथील बौद्ध विहारात ते बोलत होते. त्यांनी प्रथम तथागत गौतम बुद्ध व परम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन पुष्प अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केले .या वार्डातील नगरवाशियांच्या वतीने स्वागत करण्यात आले.डाॅ.राजरत्न आंबेडकर यांनी सभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्दिष्टांची अमलबजावणी कशी करता येईल. याविषयावर चर्चा करुन विहाराच्या वतीने सुरू असलेल्या अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा डाॅ.राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश गोस्वामी इंजि.रुपचंद रामटेके,रमेश मडामी,हरिकिसन अंबादे सशांक बडोले,यशवंत नंदेश्वर,शैलेश बन्सोड,धर्मेद्र बडोले,कैलास टेंभुर्णे,बालकदास कोटांगले,राजकुमार टेभूरकर, वैद्य,असित बागडे,इंजि.गोस्वामी आदी प्रमुख्याने उपस्थित होते.तसेच वार्ड व परिसरातील उपासक उपासिका आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राचार्य अर्जुन गोडबोले यांनी मानले.
0 Response to "सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, समता प्रस्तापित करण्यासाठी बौद्ध अनु्यायांनी पुढाकार घेणे आवश्यक - डॉ. राजरत्न आंबेडकर."
एक टिप्पणी भेजें