-->
गोशाळेतील पशुंच्या चाऱ्यासाठी गोशाळा महासंघ आक्रमक.

गोशाळेतील पशुंच्या चाऱ्यासाठी गोशाळा महासंघ आक्रमक.



• दुष्काळ परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व गोशाळातील पशुंना प्रति दिवस प्रति पशु 100 रुपये चारा अनुदान द्या.

       संजीव भांबोरे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- गोशाळा महासंघाच्या वतीने जिल्यातील सर्व गोशाळा संचालक व पशुपालकांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाकडे नोंदणीकृत 1014 गोशाळा मधील संपूर्ण पशूना चारा, पाणीसाठी प्रति दिन प्रति पशु 100 रुपये प्रमाणे अनुदान द्यावे.
.        गोशाळा संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतांना 

शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी गोशाळा व शेतकऱ्यांकडील पशुधनाचे वास्तव अत्यंत विदारक आहे पाऊस कमी झाल्याने शेतात पशु चारा, कडबा व कुटार उपलब्ध नाही तसेच पडीत जमीन, डोंगर व जंगलातील चारा उगवला नाही. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत चाऱ्याचा मोठा साठा शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पशुंच्या चारा संदर्भात मोठी समस्या भविष्यात निर्माण होणार आहे. तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे पाऊस अत्यंत कमी आल्याने विहीर, बोर, तलावे, धरणे यांच्या पाण्याची पातळी सुद्धा आज कमी झाली आहे भविष्यात गोशाळेतील पशूना व पशुपालकांना टँकरने पशूना पाणी पाजण्याची वेळ येऊ शकते या बाबींचा सुद्धा विचार सरकारने करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारने गावातील पशुपालकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावात चारा डेपो सुद्धा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. या दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्याकडील पशुधन शेतकरी मोठ्या प्रमाणात गोशाळेत आणून देत आहेत. त्या पशुधनाचा स्वीकार गोशाळा करीत आहे. त्यामुळे गोशाळा मध्ये क्षमते पेक्षा जास्त गोवंश आज झाले आहे.

दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना आपले स्वतःचे पोट भरणे कठीण झाले आहे. अशा वेळेस काही शेतकरी आपला गोवंश विक्री करीत आहे साहजिकच खरेदी करणारे शेतकरी नसून असा गोवंश मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी ना इलाजाने जात आहे. महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे. शासनाने गोमातेला राज्य मातेला दर्जा दिला आहे. गोवंश कत्तलीसाठी जाणारी गाडी गोरक्षकाने पकडली तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

या दुष्काळ परिस्थितीमध्ये आम्ही सर्व संचालक व पशुपालक आपणास विनंती करतो की आपल्या मार्फत आमच्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवावी व पशुंच्या चारा पाणी करिता शासनाने 100 रुपये प्रति दिवस प्रति पशु प्रमाणे अनुदान तत्काळ जाहीर करावे.

वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ सरसकट अनुदान वितरित करणेसाठी शासन स्तरावर विचार करून तसें आदेश निर्गमित करण्यात यावेत याकरिता गोशाळा महासंघ यांच्या माध्यमातून मा. जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी गोशाळा महासंघ चे मा. संजय जी एकापुरे, पवन कटणकर, विश्वजित कटकवार, हेमंत बांडेबूचे, यशपाल कापगते, रामेश्वर कमाने, समर्थ बडगे, सुनिलजी चड्डा,गणेश लांजेवार, नंदू गहाणे, प्रथमेश आर्य, चुटेजी, माधवम कापगते उपस्थित होते

0 Response to "गोशाळेतील पशुंच्या चाऱ्यासाठी गोशाळा महासंघ आक्रमक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article