संविधानाचे करूया रक्षण.
रविवार, 22 नवंबर 2026
Comment
रक्ताचे करुनी पाणी
डोळ्यांची करून पणती
रात्रीचा करून दिवस
बाबासाहेबांनी लिहीले आहे
नव भारताचे संविधान..1..
छातीचा करून कोट
प्राणांची लावून बाजी
घेऊन शीर हाती
शत्रूवर करून वार
संविधानाचे करू या रक्षण..2..
येतील अनंत अडचणी
शत्रू करील वार
मानू नका हार
द्यावेच लागेल बलिदान..3..
मृत्यूची भीती भ्याडाला
मृत्यु पुजला पाचवीला
धोका आहे देशाला
लढून मारा दुश्मन..4..
कर्म असे करा
शोभेल शूर वीराला
विसरून जा स्वार्थाला
देश आहे महान..5..
कवी-नागनाथ डोलारे
जेष्ठ साहित्यिक, पनवेल
0 Response to "संविधानाचे करूया रक्षण."
एक टिप्पणी भेजें