-->
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची उद्या गोंदिया जिल्ह्यात 'जन आरोग्य संवाद यात्रा'.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची उद्या गोंदिया जिल्ह्यात 'जन आरोग्य संवाद यात्रा'.



• आरोग्य संस्था भेटी, रुग्णांशी संवाद अन् आरोग्य यंत्रणेचा घेणार आढावा.

              रितेश चौरे 
साप्ताहिक "जनता की आवाज"
 
 गोंदिया :- दि. १७ नोव्हेंबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या 'गोंदिया-वर्धा आरोग्य संवाद यात्रा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना भेटी, रुग्णालयांची पाहणी, रुग्ण व लाभार्थ्यांशी संवाद तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येणार आहे. मंत्रिमहोदय सकाळी मुंबई येथून नागपूरमार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडशिवणी (ता. सडक अर्जुनी) येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत. या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील उपलब्ध आरोग्य सुविधा, वैद्यकीय सेवा, औषधसाठा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यात येणार आहे. 

दुपारी १२.३० वाजता ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी व लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत आरोग्य संवाद आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवा, आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध समित्यांच्या कामकाजाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न खाजगी सहयोग हॉस्पीटल येथे भेट देवून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णाना देण्यात येणाऱ्या सेवे बाबत माहिती घेणार आहे.

तसेच गोंदिया शहरातील खाजगी डॉक्टरां बरोबर संवाद साधारणार आहेत यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार हे संदर्भ अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न सहयोग हॉस्पिटल,गोंदिया येथे भेट व पाहणी करण्याचा कार्यक्रम आहे. तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी सायकाळी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे भेट देवून व लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे हा दौऱ्याचा प्रमुख लाभार्थी शी संवाद साधणार आहेत या आरोग्य संवाद उद्देश असल्याचे दौरा कार्यक्रमावरून स्पष्ट होते.

या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा सेवांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे, आरोग्य संस्थांमधील तयारीला लागली असून, संबंधित आरोग्य संस्थांनी सुविधा आणिरुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा घेणे आवश्यक पूर्वतयारी करण्याचे नियोजन केले आहे.

0 Response to "आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची उद्या गोंदिया जिल्ह्यात 'जन आरोग्य संवाद यात्रा'."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article