
स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय तिरपुडे
मंगलवार, 26 जुलाई 2022
Comment
भंडारा :- स्थानिक तुमसर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय तिरपुडे यांचा सत्कार समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार (संस्थापक/संपादक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामजिक संघठना,व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विजय तिरपुडे हे एक वर्षापासून स्थानिक शाखेत रुजू झाले असून एक कर्तव्यदक्ष, प्रेमळ मृदू स्वभाविक असून ग्राहकांची सेवा व समाधान नियमाचे काटेकोर शिस्तबद्ध हेतूपुरस्पर मानद दिसला सत्कार वेळी एस.बी.आय बँकेतील कर्मचारी, सम्राट अशोक सेनेची तालुका अध्यक्ष हरिदास बोरघरे, जनता की आवाज या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक मधुकर कोहाडे,व कम्प्युटर ऑपरेटर हर्षवर्धन देशभ्रतार उपस्थित होते.
0 Response to "स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय तिरपुडे"
एक टिप्पणी भेजें