अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) च्या केंद्रीय संघटक म्हणून मुकेश भजनलाल मेश्राम यांची नियुक्ती.
रविवार, 17 दिसंबर 2023
Comment
तुमसर :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी समाजिक संघटनेच्या केंद्रीय संघटक पदी मुकेश भजनलाल मेश्राम यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी समाजिक संघटना चे संस्थापक श्रीकृष्ण देशभ्रतार साहेब व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी केली आहे.मुकेश भजनलाल मेश्राम यांचे शिक्षण वेटरनरी पर्यंत झाले असून त्यांनी अनेक सामाजिक राजकीय पत्रकारितेत कार्य केले आहे. त्यांना अनेक पत्रकारितेत पत्रकार व सहसंपादक म्हणून जसे सकाळ, देशोन्नती, भंडारा पत्रिका, लोकमत अशा अनेक वृत्तपत्रासाठी कामे केले आहेत. ते आता स्वतः चित्र न्यूज या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र चे मुख्य संपादक असून ते अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय असल्यामुळे त्यांच्या सामाजिक सलोखा पाहून त्यांना संघटनेच्या केंद्रीय संघटक पदावर नियुक्ती केली असून त्यांना संघटन मजबूत करण्याचे आदेश देत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) च्या केंद्रीय संघटक म्हणून मुकेश भजनलाल मेश्राम यांची नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें