भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संमन्वयक समिती व दुग्ध संघ कर्मचारी स्नेह मिलन संपन्न.
भडांरा :- आज विवाह सेलिब्रेशन, भंडारा येथे कर्मचारी समन्वय समिती भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी, भंडारा अर्बन बँक कर्मचारी व दुग्ध उत्पादन संघाचे आजी – माजी कर्मचारी यांचा स्नेह मिलन समारोह खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या व अन्य कर्मचारी, मजूर, कामगार यांच्या हिताच्या योजना राबवण्यासाठी आगामी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहकार पॅनल महायुतीच्या उमेदवारांना पाठीशी राहून आपले मत सहकार पॅनलच्या उमेदवारांना द्या असे प्रतिपादन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.
यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल, आमदार श्री नरेंद्र भोंडेकर, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री सुनील फुंडे, श्री धनंजय दलाल, श्री विलास काटेखाये, श्री प्रदिप पडोळे, श्री प्रशांत पवार, श्री प्रशांत मालगावे, श्रीकांत वैरागडे सहित महायुतीचे उमेदवार व मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
0 Response to " भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संमन्वयक समिती व दुग्ध संघ कर्मचारी स्नेह मिलन संपन्न. "
एक टिप्पणी भेजें