विद्युत विभाग अड्याळ चा 'एक पेड माँ के नाम' विडंबनात्मक उपक्रम
बुधवार, 30 जुलाई 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
''साप्ता.जनता की आवाज"
पवनी :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील विद्युत विभाग तर्फे 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत विद्युत कर्मचाऱ्यांनी उत्साहात विद्युत खांबावर वृक्षारोपण केले. कार्यक्रमाची सुरुवात उपक्रमशील विद्युत अभियंता अड्याळ यांनी करून अड्याळ ग्रामवासी यांना विद्युत खांबावर झाडे लावून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाविषयी विडंबनात्मक तथा उपहासात्मक जागरूकता निर्माण करून केली. पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून नैसर्गिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे अड्याळ ग्रामवासी यांनी आपल्या परिसरात जास्तीत जास्त विद्युत खांबावर झाडे लावून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे विडंबनात्मक आवाहन अड्याळ येथील विद्युत अभियंता , वीज पुरवठा करणारे अधिकारी , पर्यवेक्षक , कर्मचारी , यांनी केले.
0 Response to "विद्युत विभाग अड्याळ चा 'एक पेड माँ के नाम' विडंबनात्मक उपक्रम"
एक टिप्पणी भेजें