महिला बचत गटांसाठी १० जिल्ह्यात 'उमेद मॉल'
मंगलवार, 29 जुलाई 2025
Comment
• राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्वपूर्ण निर्णय
"'साप्ता जनता की आवाज"
मुंबई :- महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रायोगीक तत्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारण्यासह उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतींना प्रोत्साहन पुरस्कार देण्याच्या निर्णयासह
आठ महत्वपूर्ण विषयांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत बैठकीत ८ महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतुने उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला आहे. प्राथमिक तत्त्वावर राज्यातील १० जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी केली जाणार आहे.
यासह राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जाणार असून त्या माध्यमातून अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून १ हजार ९०२ पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. त्यासह कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्यासाठी ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या
बैठकीत घेण्यात आला. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गोवा वकील परिषद अर्थात बार कौन्सीलला ऍडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
0 Response to "महिला बचत गटांसाठी १० जिल्ह्यात 'उमेद मॉल'"
एक टिप्पणी भेजें