भाजीपाला रोपे – यशस्वी शेतीची गुरुकिल्ली”
शुक्रवार, 25 जुलाई 2025
Comment
“
नरेश ढोक,सम्यक नर्सरी
कुलदिप गंधे ''साप्ता.जनता की आवाज"
भंडारा :- शेतकऱ्यांनी केवळ भात पिकाची शेती न करता भाजीपाला, फळबाग, फुल शेती, कुक्कुटपालन, शेततळ्यात मत्स्य पालन आणि कृषी आधारित उद्योग जास्तीत जास्त करावे असे मोलाचे मार्गदर्शन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, भंडारा अधिनस्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भंडारा अंतर्गत दिनांक २४ जुलै २०२५ ला "सम्यक नर्सरी तालुका पवनी" येथील नरेश रामचंद्र ढोक यांच्या रोपवाटिका व्यवसायाला भेट म्हणून भंडारा तालुक्यातील ५० महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या अभ्यास दोऱ्याचे आयोजित आयोजन करण्यात आले.
शेती करताना येणाऱ्या विविध अडचण आणि त्या अडचणीमध्ये त्यामध्ये मजूरटंचाई, ऊन, वारा, पाऊस विक्री व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन इत्यादी अडचणीवर मात करून एका छोट्याशा गावातील युवा शेतकरी नरेश रामचंद्र ढोक यांनी कृषि विभागातील विविध तज्ञांच्या मदतीने सम्यक नर्सरी असा रोपवाटिका व्यवसाय सुरू करून आज रोपवाटिका व्यवसायाची उलाढाल वर्षाकाठी १ करोड रुपयाची असून ते स्वतः शेडनेट आली पालीहाऊसमध्ये मध्ये उत्कृष्ट प्रतीचे मिरची, टमाटर, कोबी, वांगी अशा विविध प्रकारची रोपे तयार करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाहिजे त्या कंपनीचे चांगल्या गुणवत्तेचे शाश्वत रोपे तयार करून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रोप शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत उपलब्ध करून देतात एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील, बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन त्यातील बारकावे, विक्री व्यवस्थापन, आणि येणाऱ्या विविध टंचाईवर मात करून योग्य प्रकारे विक्री व्यवस्थापन याबद्दल असे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना करीत असतात.
नरेश रामचंद्र ढोक यांच्याकडे आजच्या घडीला अडीच एकरामध्ये पाली हाऊस आणि एक एकर मध्ये शेडनेट असून त्या शेडनेट आणि पाली हाऊस मध्ये उत्कृष्ट प्रकारचे मिरची, त्यामध्ये तलवार, गौरी, नंदिता,सटाका ,वांग्यामध्ये हर्ष, राधिका ,नंबर 38 ,कोबीमध्ये 15- 22 ,सुपरसिग्रा अशा विविध प्रकारचे विविध प्रजातीचे रोपे तयार करून त्यामध्ये कोकोपीट आणि प्लास्टिक ट्रेच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारची गुणवत्तेची रुपये तयार करतात.
नरेश रामचंद्र ढोक यांच्या रोपवाटिका व्यवसायामध्ये दररोज २० कुशल मजूर मजुरांना नियमित वर्षातील बाराही महिने रोजगार उपलब्ध करून देतात. म्हणून एका छोट्याशा गावातील एक तरुण शेतकरी एक आदर्श रोपवाटिका व्यावसायिक कसा होऊ शकतो त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेश ढोक हे होय.
नरेश ढोक यांनी शून्यातून खूप मोठा विश्वास तयार केला असून त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी सुद्धा यांच्या व्यवसायाशी निगडित आहेत आणि त्यांची सुद्धा त्यांना फार मोलाची मदत होत आहे. एवढेच नव्हे तर जवळपास 20 ते 25 एकरावर नेठाफेम कंपनीचा *ऑटोमैझेशनच्या साह्याने ठिबक सिंचनाच्या सहाय्याने इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित* संपूर्ण शेताला भाजीपाला शेताला पाणी आणि फर्टिगेशन चे व्यवस्थापन व्यवस्थापन ते मोबाईल फोनवर करित असतात.
सदर अभ्यासदौ ऱ्याचे आयोजन सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,भंडारा यांनी करून अभ्यासदौरा यशस्वीतेकरिता कु.वैशाली सोनवाणे सहाय्यक कृषी अधिकारी, हत्तीडोई, कु.अलका दहिवले सहाय्यक कृषि अधिकारी, गुंजेपार आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी सखी वैशाली मते, सपना पेंदाम तालुका कृषि अधिकारी कार्यालय, भंडारा अंतर्गत अधिकारी,कर्मचारी आणि शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले....
0 Response to "भाजीपाला रोपे – यशस्वी शेतीची गुरुकिल्ली”"
एक टिप्पणी भेजें