खामगाव येथील बौध्द समाजाच्या व्यक्तीला जात विचारून मारहाण 'त्या' गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : कुणाल पैठणकर
बुधवार, 30 जुलाई 2025
Comment
जीतेद्रं गाडेकर
''साप्ता.जनता की आवाज"
बुलडाणा :- जिल्हाधिकारी बुलढाणा यांना बुलढाणा शहरातील समस्त तमाम आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले की, २३ जुलै २०२५ च्या रात्री खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी रोहन पैठणकर (अनुसूचित जाती बौध्द) हा तरुण खामगाव बस स्टॉप वर बसलेला असताना तीन जातीयवादी मनुवादी गावगुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला खामगाव येथे काँग्रेस भवन या ठिकाणी नेऊन "तू कोणत्या जातीचा आहेस? असे म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आली. तसेच पीडिताची "तुझी जात कोणती आहे ? त्याने बौध्द सांगीतले म्हणून जात विचारून ह्या मनुवाद्यांनी त्याचे वस्त्र काढून नग्न करण्यात आले. त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणावरती नेऊन आणखी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली व गंभीर जखमी करण्यात आले. सदर ही बाब खूप गंभीर आहे.
सदर प्रकार गाय चोरीचे काल्पनिक निमित्त करून या जातीयवादी तिन्ही आरोपींनी जाणीवपूर्वक केला आहे. हा प्रकार घडून आणणाऱ्या तीनही आरोपींवर यापूर्वी खामगाव पोलीस स्टेशन मध्ये विविध प्रकारचे क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत. यावरून हे तिन्ही आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत हे समजते. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पगारिया हा व्यक्ती दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यातील एक आरोपी गब्बू गुजरीवाल या आरोपीवर अंतर्गत पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे.
अशा गावगुंडांना व माणसा माणसात व जातीजातीत तेढ निर्माण करणाऱ्या व खतपाणी घालणाऱ्या कथित जातीयवादी संघटनेवर बंदी घालण्यात यावी. हे प्रकरण मानव जातीला काळीमा फासणारे आहे. जातीय द्वेष निर्माण करून दोन गटांमध्ये जाणीवपूर्वक प्रकार घडवल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे.
तरी बरील गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक न्यायालयातुन कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी व जखमी रोहन पैठणकर हा एका डोळ्याने आपंग झाल्यामुळे त्याला शासनाने एक कोटीची आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे व असे व असे जिजाऊ, शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्रात असे प्रकार होतात ही महाराष्ट्रासाठी आपमानास्पद बाब आहे तरी या अशा कृत्य करणास्थांचा बंदोबस्त करावा म्हणजे असे प्रकार होणार नाही या कडे शासन प्रशासनाने याची दखल घेऊन
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी म्हणजे असे प्रकार पुन्हा होणार नाही याची दखलघ्यावी अशी मागणी शासनाकडे या निवेदनात करण्यात आली. निवेदनाद्वारे शासनाला इशारा देण्यात आला आहे की, आम्ही केलेल्या मागण्याची दखल जर घेतली नाही तर संपूर्ण जिल्हाभर आंदोलन उभारण्यात येईल व त्या आंदोलनाचे काही विपरीत परिणाम झाल्यास शासन प्रशासन जब्बादार र आई होईल याची नोंद घ्यावी. या निवेदनावरती सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, सम्राट संघटनेचे संस्थापकध्यक्ष आशिष बाबा खरात, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी. आर. माळी, भारतीय बौद्ध महासभेचे एस. एल. डवरे, समाजभूषण अनंता मिसाळ, कामगार नेते प्रल्हाद कांबळे, पँथर आकाश हीवाळे, मुकेश हिवाळे, रविकिरण मोरे किशोर सुरडकर संदीप इंगळे, सचिन मिसाळ, प्रेमदास काकडे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी बहुसंख्येने आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती.
0 Response to "खामगाव येथील बौध्द समाजाच्या व्यक्तीला जात विचारून मारहाण 'त्या' गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : कुणाल पैठणकर"
एक टिप्पणी भेजें