-->
तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेची बॅग चोरी; दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेची बॅग चोरी; दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

Image Source : Shutterstock

तुमसर, दि. 6 जुलै :- तुमसर रोड रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी घडलेल्या चोरीच्या घटनेत रेल्वे पोलिसांनी दोन चोरट्यांना तात्काळ कारवाई करत अटक केली. ही घटना शनिवारी, ५ जुलै रोजी सकाळी ७वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रवासी महिला रेल्वेची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्मवर बसली होती, त्यावेळी तिच्या जवळील बॅग आणि मोबाईल अचानक चोरीस गेले. महिलेने त्वरित तुमसर रोड रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला आणि काही वेळातच दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्यासोबत असलेला एक साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी ठरला.

रेल्वे पोलीसांनी त्यांना विचारले असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पकडले गेलेले दोन्ही चोरटे बाहेरून येऊन तुमसर रोड येथे भाड्याने राहत होते आणि कप-बश्या विक्रीच्या नावाखाली परिसरात फेऱ्या मारत होते. त्यांच्याकडून चोरी गेलेली बॅग व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी त्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 Response to "तुमसर रोड रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेची बॅग चोरी; दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article