17 ऑगस्ट पासून ऐतिहासिक बौद्धगया मुक्ती आंदोलन.
बुधवार, 27 अगस्त 2025
Comment
• दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई भव्य धम्मध्वज यात्रा पूज्य भदंत विनाचार्य यांच्या नेतृत्वात सुरू
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- बिहार बुद्धगया महाबोधी महाविहारासाठी आंदोलन करणारे पूज्य भन्ते विनाचार्य यांचा जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा २० ऑगस्टला अकोला जिल्ह्यात आले होते.महाबोधी महाविहार मुक्तीच्या,समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्म ध्वज यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून 17 ऑगस्ट 2025 पासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी अॅक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन.ही पंचशील धम्मध्वज,जनसंवाद यात्रा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रनेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या प्रमुख नेतृत्वात व कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा डॉ भिमराव आंबेडकर यांच्या पाठीब्याने तसेच प्रामुख्याने पूज्य भन्ते ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा,पूज्य भन्ते सारीपुत्र,पूज्य भन्ते महानाम अकोला व आदी भिक्खू संघाच्या उपस्थितीत ही पंचशिल धम्मध्वज यात्रा निघाली.दीक्षाभूमी ते चैत्यभूमी जात असतांना दि.20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 12 वाजता भीम नगर जुने शहरातील शिवली बुद्ध विहार येथून महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्म ध्वज यात्रा निघाले.भीम नगर जय हिंद चौक,सिटी कोतवाली,गांधी चौक बस स्टॅन्ड ते अशोक वाटिका येथे महामानवांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले,त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी अकोला येथे जाहीर सभा घेण्यात आले त्याआधी बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांचा आयोजित केला होते, त्यानंतर उपस्थित भिक्षु संघाचे जनसंवाद धम्मदेसना झाले.अकोला जिल्ह्यातील शहरातील,सर्व बुद्ध विहार तमाम उपासक,उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यात सहभाग घेतल अकोला जिल्ह्यातील उपासक उपासिका यात सहभागी होते.
0 Response to "17 ऑगस्ट पासून ऐतिहासिक बौद्धगया मुक्ती आंदोलन."
एक टिप्पणी भेजें