मोहाडी पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई 225910/रुपयाचा मुद्देमाल जप्त
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
.संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पोलीस स्टेशन मोहाडी अंतर्गत आरोपी नामे मारुती मुराजजी बशिने वय 47 वर्ष राहणार मांडेसर तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यातील फिर्यादी यांनी रेड केली असता नमूद आरोपी हा मोजा मांडेश्वर शिवारातील नाल्यालगत मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील एक लोखंडी ड्रम ठेवलेला किंमत 500/रुपये, त्यामध्ये 50 किलो सडवा मोहापास २०० रुपये किलो प्रमाणे एकूण 10000 रुपये, एक जर्मन घमेला किलो 500 रुपये , प्लास्टिक पाईप एकूण किंमत 10 रुपये , एक जर्मन टवरा किंमत 50 रुपये , पाच दिनाचे पिपे एकूण किंमत 50/ रुपये,50 किलो जलाऊ लाकडी काड्या एकूण किंमत 500/, रुपये एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक डबकीत अंदाजे 50 लिटर हातभट्टी दारू प्रत्येकी 200/ रुपये लिटर प्रमाणे एकूण किंमत10000/ रुपये , 5 मोठ्या प्लॅस्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी ड्रम मध्ये 100 किलो प्रमाणे एकूण 500 किलो प्रत्येकी 200/रुपये किलो किंमत 10000/रुपये, व 5 मोठे प्लास्टिक ड्रम प्रत्येकी किंमत 500/ रुपये प्रमाणे एकूण किंमत 2500/रुपये, 4 लहान प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी ड्रम मध्ये 50 किलो प्रमाणे एकूण 200 किलो सड्या मोहपास 200/रुपयेकिलो प्रमाणे एकूण किंमत 40000/ हजार रुपये ,व 4 प्लास्टिक ड्रम प्रत्येकी किंमत 300/रुपये प्रमाणे एकूण किंमत 1200/रुपये, 3 प्लास्टिक चुंगड्यामध्ये प्रत्येक चुंगळीत 100 किलो प्रमाणे सड्या मोहापास एकूण 300 किलो एकूण200/रुपये किलो प्रमाणे किंमत 60000/ हजार, एक लोखंडी ड्रम किंमत 500/रुपये, एक नेवार पट्टी किंमत00, एक जर्मन झाकण किंमत 100/रुपये असा एकूण 2 लाख 25 हजार 910मिळून आल्याने आरोपीविरुद्ध अप क्रमांक /209 / 2025 कलम 65 (फ ब क ड ई)म.दा .का .नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक बेलख़ेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई मालाधरे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन मोहाडीचे अधिकारी करीत आहेत.
0 Response to "मोहाडी पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई 225910/रुपयाचा मुद्देमाल जप्त"
एक टिप्पणी भेजें