स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध दारु तस्करीवर कारवाई; एकुण 62,000/- रु. चा मुद्देमाल जप्त
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
कुलदीप गंदे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अडयाळ :- पोलीस स्टेशन अड्याळ अंतर्गत आरोपी नामे सुनील गोमाजी मेश्राम, वय 40 वर्षे, रा. संगम / पुनर्वसन ता. जि. भंडारा, यातील फिर्यादी पेट्रोलिंग करित असता नमुद आरोपी हा श्रीनगर येथील सभामंडप रोडवर तस्करी करतांनी मिळून आल्याने त्याचे ताब्यातील 1) 3 रबरी ड्युब मध्ये मध्ये प्रत्येकी 20 लिटर प्रमाणे 60 लिटर प्रति लिटर 200/- रु. प्रमाणे 12,000/- रु. 2) एक कथीया कलरची ज्युपीटर गाडी अंदाजे कि. 50,000/- रु. असा एकुण 62,000/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुध्द कायमी अप.क्र. 209/2025 कलम 65 (अ) म.दा. का. नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा., पोनि. चिंचोळकर सा. यांच्या मार्गदर्शनात पोहवा. कठाणे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अड्याळ चे अधिकारी करीत आहेत.
0 Response to "स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध दारु तस्करीवर कारवाई; एकुण 62,000/- रु. चा मुद्देमाल जप्त"
एक टिप्पणी भेजें