नागपूर येथील समरगीत स्पर्धेत भावेश कोटांगले यांची चमू ठरली अव्वल
सोमवार, 11 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- नागपूर येथे आयोजित समरगीत / स्फुर्तीगीत स्पर्धेत प्रबोधनकार कला व साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले यांच्या नेतृत्वातील साकोली येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र. १ नागपूर यांच्या वतीने गटस्तरीय सांघिक समरगीत/स्फूर्ती गीत स्पर्धा दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी ललित कला भवन इंदोरा नागपूर येथे आयोजित केली होती. सदर स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र साकोली संघाच्या वतीने साकोली येथील कामगार कल्याण केंद्र प्रमुख सतिश कुटे यांच्या मार्गदर्शनात प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीचे पदाधिकारी कलावंत यांनी या समरगीत स्पर्धेत सहभाग घेवून उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची व
स्पर्धेतील परिक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत या चमूने अव्वल क्रमांक पटकावून साकोली तालुक्याची मान उंचावली.
या चमूमध्ये भावेश कोटांगले, लक्ष्मीकांत बोरकर, संदिपकोटांगले, पितांबर सूर्यवंशी, वृषभ पारधी, हासराम तुमसरे, अर्चना कान्हेकर, करिष्मा भाग्यवंत, संगीता पुस्तोडे, प्रज्ञाशील मेश्राम, खुशाल इठोले, अभिषेक रामटेके, प्रल्हाद भुजाडे यांचा सहभाग होता.
0 Response to "नागपूर येथील समरगीत स्पर्धेत भावेश कोटांगले यांची चमू ठरली अव्वल"
एक टिप्पणी भेजें