-->
आत्महत्या शेतकरी स्मृती प्रित्यर्थ नारळी पौर्णिमा निमित्त "काळी राखी" बांधून,शासन जागर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या केला विरोध.

आत्महत्या शेतकरी स्मृती प्रित्यर्थ नारळी पौर्णिमा निमित्त "काळी राखी" बांधून,शासन जागर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या केला विरोध.


नरेंद्र मेश्राम (जि.प्र.नि.) 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- दि. ९ ऑगस्ट २०२५ रोज शनिवारला संपूर्ण देशभरात क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, रक्षाबंधन मोठ्या उत्सवात साजरा होत असताना, वंदनीय अपंग हृदय सम्राट बच्चू भाऊ कडू यांचे नेतृत्वात महाराष्ट्रात आज पर्यन्त ६ लाख आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन दिनी सत्ताधाऱ्यांच्या मनाला जागविण्यासाठी बांधुया "काळी राखी" शेतकर्‍यांच्या वेदनेची, संतापाची, जागृतीची जाणीव करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला "काळी राखी" विधवा, अपंग महिलांच्या हस्ते बांधून भंडारा जिल्ह्याच्या वतीने साई मंदिर समोर, बाजार चौक पालांदूर येथे "वेदनेचा धागा" आंदोलन करण्यात आला.
ही राखी नाही श्रद्धांजली आहे, सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सहा लाख शेतकऱ्यांच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलं..! म्हणून नरेंद्र व देवेंद्र भाऊला काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नऊ ऑगस्ट 2025 रक्षाबंधन दिनी संपूर्ण महाराष्ट्रभर "वेदनेचा धागा" आंदोलन करण्यात आले. 
 यावेळी प्रहार कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन करून सरकार शेतकरी सोबत कसा भेदभाव करते आणि धोरणामुळे कशा आत्महत्या होतात हे सांगितले यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी, प्रहार अपंग क्रांति संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मने, जनशक्तिचे जिल्हा सचिव जयेंद्र देशपांडे, प्रहार अपंग क्रांति चे जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, लाखनी तालुका अध्यक्ष सुनील कहालकर, भंडारा तालुका अध्यक्ष राजेंद्र नेवारे, शहर अध्यक्ष चंद्रशेखर दुरुगकर, लाखाँदूर तालुका अध्यक्ष साजन बोकडे, नारद गायधने, विनय बुलबुले,हेमराज गोटेफोडे, भास्कर काटगाये, गुलजारीलाल बनसोड, माणिक फेंडरजी अनेक प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, विधवा, उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आणि सांगता योगेश्वर घाटबांधे यांनी केली.

0 Response to "आत्महत्या शेतकरी स्मृती प्रित्यर्थ नारळी पौर्णिमा निमित्त "काळी राखी" बांधून,शासन जागर म्हणून महाराष्ट्र शासनाच्या केला विरोध."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article