जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल ग्रंथालयाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न
शनिवार, 2 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा, दि. ०१ : राज्य शासनाच्या प्रशासनातील डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या महसूल ग्रंथालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन प्रसंगी विधान परिषद सदस्य् परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, माजी खासदार सुनील मेंढे, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके-ढेंगे व कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ई-लायब्ररीच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित महत्वाचे दस्तऐवज, नियमावली, शासन निर्णय, परिपत्रके आणि विविध कायदे आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना माहिती सहज, जलद आणि अचूक पद्धतीने मिळणार असून, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
महसुल मंत्री बावनकुळे या प्रसंगी बोलताना म्हणाले, “ई-लायब्ररी हे केवळ डिजिटल सुविधा नसून, ही एक शाश्वत ज्ञानसंपत्ती आहे. जी महसूल विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची गुणवत्ता वाढवेल. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या गतिमानतेला चालना मिळेल व नागरिकांना वेळेत सेवा उपल्बध होतील.”
या ई-लायब्ररीत महसूल विषयक जुने आणि नवीन सर्व दस्तऐवजांची वर्गवारी करून त्यांचे सुलभ आणि शोधसुलभ स्वरूपात डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यात प्रशिक्षणासाठी उपयुक्त दस्तऐवज, विविध योजना, भू-संपत्तीबाबत मार्गदर्शक तत्वे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सर्व महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी इत्यादींसाठी माहिती स्रोत उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते. या उपक्रमामागील संकल्पना आणि अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल ग्रंथालयाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न"
एक टिप्पणी भेजें