-->
श्रीक्षेत्र देवबर्डी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण स्वामीदर्शन महानुभाव मंडळाचा अनोखा उपक्रम.

श्रीक्षेत्र देवबर्डी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण स्वामीदर्शन महानुभाव मंडळाचा अनोखा उपक्रम.

जनता की आवाज
वृत्त संकलन 

पचखेडी :- श्रीक्षेत्र देवबर्डी येथे स्वामीदर्शन महानुभाव मंडळाद्वारे वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाध्यक्ष पूज्य महंत वाकीकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीदत्त मंदिर व महानुभाव आश्रम देवबर्डी येथील परिसरात टाळ, मृदंगाच्या तालात व ईश्वर नामाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. मंडळाच्या सदस्यांनी परिसरात विविध वृक्षांची रोपटे व फुलझाडांची लागवड केली. तद्नंतर महंत वाकीकर बाबांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

निसर्गाला जपणे म्हणजे परमेश्वर व प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. निसर्ग संवर्धन व वृक्ष संगोपन हे जीवन मूल्यांचा एक भाग असावे, असे पूज्य बाबा आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले. याप्रसंगी मोहोपाच्या माजी नगराध्यक्ष शोभा कउटकर, सावंगी सरपंच आशितोष तभाने,

मसेपठार ग्रा.पं. सदस्या प्रिया कुबडे, मांडवी जूनघरे, उद्धव वाकीकर, स्वामीदर्शन मंडळाचे अध्यक्ष मनोज बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा कउटकर, उध्दव वाकीकर, मनोज बोरकर, उपाध्यक्ष यशोदा निमगडे, ताम्रध्वज खोब्रागडे, छाया कलासुवा, राहुल शेंडे यांची मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.

महिला सदस्यांनी 'आज आनंदी आनंद झाला...' गीतावर फेर धरत कार्यक्रमात रंगत आणली. या उपक्रमाबद्दल मंडळ अध्यक्ष बोरकर यांचा आश्रमाच्या वतीने बाबाजींचे हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी वजन व मापे अधिकारी तेजेंद्र गजभिये, सुनील फरकाडे, रमेश सिरस्कर, नलु श्रीखंडे, दिवाकर कऊटकर, विष्णू पोतले, डॉ. खुशाल देशभ्रतार उपस्थित होते. माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी रोपटे उपलब्ध करुन दिलीत. प्रास्ताविक मनोज बोरकर, संचालन पूज्य कल्याणदादा वाकीकर यांनी केले, तर आभार श्रद्धा चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे कोषाध्यक्ष भूपेश शेंडे, चेतन मेश्राम, अशोक पवार, स्नेहल गजभिये, पुष्पा मोटघरे, राजेंद्र डोंगरे, रेवेंद्र उके, अर्चना बारमाटे, प्रिया शेंडे, प्राजक मेश्राम, घनश्याम मेश्राम यांनी परिश्रम

0 Response to "श्रीक्षेत्र देवबर्डी येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण स्वामीदर्शन महानुभाव मंडळाचा अनोखा उपक्रम."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article