समर्थ महाविद्यालयातील सर्व घटकांचा अवयवदानाचा संकल्पआंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दृढ निश्चय.
बुधवार, 13 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- 13 ऑगस्ट 2025 – समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्रसेना (NCC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भगिनी निवेदिता सभागृहात अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनंजय गभने उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. कापसे यांनी अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करताना, “अवयवदान ही काळाची गरज असून, महाविद्यालय मागील अनेक वर्षांपासून या चळवळीत सक्रिय आहे,” असे सांगितले. त्यांनी लाखनी परिसरातील अवयवदानकर्त्या कुटुंबाचा सत्कारही केला आणि विद्यार्थ्यांना अवयवदानाची शपथ देत, या चळवळीत सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. बंडू चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. बालकृष्ण रामटेके यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "समर्थ महाविद्यालयातील सर्व घटकांचा अवयवदानाचा संकल्पआंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दृढ निश्चय."
एक टिप्पणी भेजें