-->
संस्कृत, संस्कृती व संस्कारातूनच समृद्ध भारताची उभारणी – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे.

संस्कृत, संस्कृती व संस्कारातूनच समृद्ध भारताची उभारणी – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे.


समर्थ महाविद्यालयात ‘संस्कृत दिन’ उत्साहात साजरा.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- दि. 9 ऑगस्ट समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज ‘संस्कृत दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे होते. यावेळी संस्कृत शिक्षिका प्रा. रूपाली खेडीकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संगीता हाडगे, डॉ. धनंजय गभने, प्रा. अशोक गायधनी हे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारताला संपन्न अशी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. आज जगाच्या पटलावर सर्व क्षेत्रांत भारतीय आपली कर्तृत्वाची छाप पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला अधिक समृद्ध बनविण्यासाठी जगातील आद्य भाषा संस्कृतचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतीय जीवनशैलीची पायाभरणी संस्कृत तत्त्वज्ञानातूनच झाली असून, सर्व वैचारिक वैभव संस्कृत भाषेने समृद्ध केले आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने तिला जागतिक स्तरावर सन्मान मिळणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती ही संस्कृत तत्त्वज्ञानातूनच आकारली असून, संस्कारांचे मूळही याच भाषेत आहे. संस्कृत, संस्कृती आणि संस्कार या त्रिवेणी संगमातून भारतीय जीवनशैली समृद्ध होत गेली आहे. या सर्वांचे श्रेय ‘संस्कृत’ भाषेला देणे आपले कर्तव्य आहे.”
प्रा. रूपाली खेडीकर यांनी संस्कृत भाषेतील सुभाषिते आणि श्लोकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. संगीता हाडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. धनंजय गभने यांनी मानले.

0 Response to "संस्कृत, संस्कृती व संस्कारातूनच समृद्ध भारताची उभारणी – प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article