गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज रोजी ४३ वर्ष पूर्ण झाले.
बुधवार, 27 अगस्त 2025
Comment
• त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कुलदिप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
गडचिरोली :- गडचिरोली हा आमच्यासाठी राज्यातील शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. २०१४ पासून गडचिरोलीला विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न झाला असून, माओवादमुक्त करणे, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आज जिल्हा माओवादमुक्त होत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या २०२६ पर्यंत देश माओवादमुक्त करण्याच्या निर्धाराकडे आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत.
सी-६० जवान व पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून ‘दादालोरा खिडकी’सारख्या उपक्रमांनी पोलीस विकास प्रक्रियेतील खरे अग्रदूत ठरले आहेत. गडचिरोलीला पोलाद सिटी बनविण्यासाठी १ लाख कोटींची गुंतवणूक होत असून, या प्रक्रियेत जिल्ह्याचे जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण यांचे संवर्धनही तेवढ्याच गांभीर्याने केले जात आहे. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्त्यांची कामे व शिक्षणाच्या सुविधा या सर्व क्षेत्रांत गडचिरोली वेगाने प्रगती करत आहे आणि यात नागरिकांची भक्कम साथ लाभत असल्याने विकास प्रक्रिया गतिमान झाली आहे – मुख्यमंत्री
0 Response to "गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज रोजी ४३ वर्ष पूर्ण झाले."
एक टिप्पणी भेजें