पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया रद्द• मॅट न्यायालयाच्या निर्वाळा.•पत्रकार परिषदेत अंकुश वंजारी यांनी दिली माहिती.
शुक्रवार, 1 अगस्त 2025
 Comment 
कुलदिप गंधे (प्र.निधी)
"साप्ता.जनता की आवाज"  
भंडारा :- असे की दिनांक.१६/३/२०२३ ला ४९ गावासाठी भंडारा उपविभागात पोलिस पाटील पदभरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली , त्या अनुष्गाने ४८गावातून विविध आरक्षणातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जाहिरातीतील जाहीरनामा प्रमाणे पदभरती होत नसल्यामुळे भरती प्रक्रिया दरम्यान वरिष्ठांना निवेदन व तक्रारी देण्यात आल्या होत्या . त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.योगेश कुभेजकर यांनी सकारात्मकता दाखवत तक्रारीची दखल घेऊन चौकशी समिती नेमून निष्पक्ष चौकशी करून तत्कालीन सरकारला अहवाल सादर केला .
 त्यानंतर सरकारने कार्यवाही केली व १)रविंद्र राठोड(उपविभागीय अधिकारी) २) अरविंद हिंगे (तहसीलदार भंडारा )३) नीलिमा रंगारी (तहसीलदार पवनी ) यांना निलंबित करून निवड झालेल्या पोलिस पाटील यांना ४ /७/२०२३ ला कार्यमुक्त करण्यात आले.कालांतराने कार्यमुक्त पोलिस पाटील यांनी MAT कोर्ट मध्ये जाऊन आह्वान केले त्याठिकाणी राज्यसरकार नी त्यांची  बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे दिनांक ५/१०/२०२३ ला कार्यमुक्त पोलिस पाटील यांना रुजू आदेश करण्यात आले .त्या आदेशानुसार ते रुजू झाले .
ह्या भरती प्रक्रियेत उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांना डावलून लेखी परीक्षेत कमी गुण असणाऱ्यांना तोंडी परीक्षेत निवड समितीने मर्जीतील गुण देऊन ४८ पैकी ३० उमेदवारवर अन्याय केला त्यामुळे या भरती प्रक्रियेत आर्थिक देवाण घेवाण झाली अशी शंका होती व समाज माध्यमात चर्चा झाली व अन्याय धारक उमेदवार यांनी ५ /१/२०२४ ला उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे ॲड सुमंत देवपुजारी यांच्यावतीने याचिका दाखल केली .त्यामध्ये मा.न्यायमूर्ती अविनाश घरोटे व मा.न्यायमूर्ती अभय मंत्री याच्या दिनांक २२/४/२०२५ ला भरती प्रक्रियेतील निवड समिती ही चुकीची आहे असा निर्णय देऊन प्रकरण MAT न्यायालयात वर्ग करून ३ महिन्यात निर्णय द्या असा आदेश करण्यात आला.त्यानंतर MAT न्यायालयात युक्तिवाद झाला त्यावेळी सुद्धा ॲड सुमंत देवपुजारी उपस्थित होते त्यांनी भक्कम पने बाजू मांडून पुरावे सादर केले तेव्हा MAT न्यायालयाने एक पाऊल पुढें टाकून भरती प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचे न्यायमूर्ती विनय जोशी सर (MAT court) यांनी दिनांक २५/७/२०२५ ला निर्णय देत भरतीप्रक्रिया रद्द केली .यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲड,. एस. ए . सैनिस यांनी सरकारची बाजू मांडली तर कार्यमुक्त पोलिस पाटील यांच्या वतीने .ॲड , काकानी, ॲड,चितळे, ॲड खापरे, व इतर तसेच अन्यायधारक उमेदवार चे बाजूने ॲड,सुमंत देवपुजारी  यांनी यूक्तिवाद करून न्याय मिळवून दिला .सर्व अन्याय धारक उमेदवारांनी न्यायमूर्ती व ॲड,देवपुजारी व डॉ.योगेश कुभेजकर  ,अंकुश वंजारी.परमानंद मेश्राम, बालू ठवकर ,प्रमोद केसरकर यांचे अभिनंदन व आभार मानले .त्याचप्रमाणे या न्यायालयीन लढा मध्ये ज्यांनी सुवातीपासून सहकार्य केले त्यांचे आभार मानले.यानंतर होणाऱ्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत सूक्ष्म लक्ष ठेवून भरती प्रक्रिया पारदर्शक होईल असे मत श्री.अंकुश वंजारी (प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख भंडारा ) यांनी सांगितले उपस्थित , सौ.रोशना प्रदीप मोहरले,सौ.लता सुरेंद्र पडोळे,सौ वर्षा संजय चांदेकर , सौ.शारदा गणेश बुदे,अंकुश ऋषी पंचबुधे हे उपस्थित होते
0 Response to "पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया रद्द• मॅट न्यायालयाच्या निर्वाळा.•पत्रकार परिषदेत अंकुश वंजारी यांनी दिली माहिती."
एक टिप्पणी भेजें