हल्लेखोरांना अटक करा. आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन ची मागणी.
शुक्रवार, 1 अगस्त 2025
 Comment 
 नरेन्द्र मेश्राम 
"'साप्ता.जनता की आवाज" 
भंडारा :- जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात डॉ.मधुकर कुंभरे यांचेवर भ्याड हल्ला करणारे श्री समशेर खान व श्री विजय क्षीरसागर रा.भंडारा यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय , अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तात्काळ अटक करण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन जिल्हा शाखा भंडाराचे  पदाधिकाऱ्यांनी  मा. जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे . सामान्य रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर (राजपत्रित) यांना त्यांच्याच  कार्यालयात जाऊन नीच शब्दात बोलून हया दोन व्यक्तींनी गुन्हा केलेला आहे. जिल्ह्यामध्ये असे उद्योग चालविणारे काही मवाली आहेत की ज्याचा जीवन अधिकाऱ्याकडून खंडणी वसूल करून आपला चरितार्थ करीत असतात अशा व्यक्तीमुळे सामान्य माणसाला विनाकारण मानसिक त्रासाला सामोर जावे लागते. हया चोरांच्या उलट बोंबा असतात. कारनामे स्वतः करायचे व समाज माध्यमावर व वर्तमान पत्रात दुसऱ्याची बदनामी करायची. अशा दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा बसवा यासाठी अटकेची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन जिल्हा शाखा भंडाराचे अध्यक्ष गोवर्धन कुंभरे, सल्लागार अजाबराव चिचामे, गणपत मडावी, एकनाथ मडावी, पूनम वरकडे, धनलाल तीलगामे, हेमराज चौधरी,सहादेव धुर्वे, ज्ञानेश्वर कौरेती , श्रीधर कोड़वते, अमृत कोड़वते यांनी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0 Response to "हल्लेखोरांना अटक करा. आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन ची मागणी."
एक टिप्पणी भेजें