-->
वडसा – रेल्वे बोगद्याच्या निकृष्ट कामावर आमदार रामदास मसराम यांचा संताप, उद्या तातडीची बैठक.

वडसा – रेल्वे बोगद्याच्या निकृष्ट कामावर आमदार रामदास मसराम यांचा संताप, उद्या तातडीची बैठक.



"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन

वडसा :- वडसा परिसरातील रेल्वे बोगद्याच्या कामातील निकृष्ट दर्जा आणि त्यातून स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाची प्रत्यक्ष पाहणी आमदार रामदास मसराम यांनी केली. पाहणीदरम्यान प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आमदार मसराम आक्रमक झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मागील काही महिन्यांपासून या बोगद्याचे काम सुरू असताना नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, काम सुरू असताना तब्बल पंधरा दिवस बोगदा बंद ठेवण्यात आला होता, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. या दरम्यान प्रवासाचा कालावधी वाढणे, वाहतूक कोंडी, पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचणे यांसारख्या समस्यांमुळे लोक त्रस्त झाले होते.

आजच्या पाहणीवेळी आमदार मसराम यांनी सांगितले की, “लोकांच्या पैशातून काम केले जात असताना अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला कधीही सहन केले जाणार नाही. ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. सार्वजनिक सुरक्षेला धोकादायक असे काम करणे हा गंभीर विषय असून, दोषींवर कठोर कारवाई होईल.”

या पार्श्वभूमीवर आमदार मसराम यांनी उद्या, दिनांक 12 ऑगस्ट रोजी वडसा येथे सर्व प्रशासकीय अधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि काम करणाऱ्या ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कामाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेऊन सुधारणा करण्यासाठी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

त्या वेळी उपस्थित तहसीलदार प्रितीताई डुडुलकर, रेल्वे अभियंता शेंडे, माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस क . तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,गणेश फाफट, राजू राशेकर, माजी उपसभापती नितीन राऊत, सागर वाढई,युवक काँग्रेस क तालुकाध्यक्ष अमर भर्रे, विकास प्रधान,कमलेश बारस्कर ,प्रमोद मेश्राम, शैलेश बगमारे,प्रमोद पत्रे, परशुराम ठाकरे,प्रशांत किलनाके,धनपाल आदे , स्वप्निल मिसार, गौरव शिलार, जितू चौधरी, प्रकाश समर्थ, कैलास वानखेडे, संजय करणकर, प्रकाश सांगोडे, पुराम साहेब, मेश्राम, उज्जू मेश्राम,

स्थानिक नागरिकांनी आमदार मसराम यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपाचे स्वागत केले असून, बैठकीनंतर दर्जेदार आणि वेगवान काम पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

0 Response to "वडसा – रेल्वे बोगद्याच्या निकृष्ट कामावर आमदार रामदास मसराम यांचा संताप, उद्या तातडीची बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article