-->
भंडारावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार उर्मिला चिखले - प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा.

भंडारावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार उर्मिला चिखले - प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा.

 

 • महाराष्ट्र शासन कृषी विभाग , कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा आणि  प्रकल्प अधिकारी एकात्मिक, आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत

 • दिनांक १२ ऑगस्ट २०२५ ला इंद्रलोक सभागृह, नागपूर रोड, भंडारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे अयोजन करण्यात आले.

 कुलदि गंधे
 "साप्ता जनता की आवाज"

 भंडारा :- सदर रानभाजी महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सप्ताह कार्यक्रम म्हणून दिनांक ९ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट पर्यंत क्रांतिकारक अदिवासी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा करावया असतो.

 सदर रानभाजी महोत्सवामध्ये 
रानातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या यात शेवगा, तरोटा,पातूर,केना,मोहफुलें,अंबासात्या,काटवल,करवंद,तांदुळजा, अडुळसा, उंदिरकांन,हरदोली,शेरडीरे,वसंवेल इत्यादी जवळपास ४५ ते ५० प्रकारच्या रानभाज्या व त्यांची पाककृती प्रदर्शनामध्ये ठेवून त्यांचे दैनंदिन आरोग्यामध्ये असणारे महत्त्व पटवून देण्यात येणार असून महोत्सवामध्ये आत्मा अंतर्गत गट, उमेद अंतर्गत गट, महिला, कृषि सखी, पशू सखी आणि महिला आर्थिक विकास अंतर्गत महिलांचा/ गटांचा समावेश राहणार भंडारावासियांना रानभाज्या आणि पाककृती यांची चव नक्कीच मिळणार आहे.

सदर महोत्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्व, औषधी गुणधर्म, त्यामध्ये असणारे जीवसनत्वे, व्हिटॅमिन्स आणि विशेषतः नैसर्गिक रित्या असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे कीटकनाशकांची फवारणी नसल्याने ते विषमुक्त म्हणून सरीरासाठी आरोग्यदायी असून त्यांचा जास्तीत जास्त मानवी आहारामध्ये सेवन करावे व रोगमुक्त जीवन कसे जगता येईल याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचे आवाहन *भंडारा आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा, उर्मिला चिखले* यांनी आवाहन केले आहे.

0 Response to "भंडारावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार उर्मिला चिखले - प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article