-->
लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रमाचेगटशिक्षणाधिकारी शंकर राठोड  यांच्या हस्ते सुरुवात.

लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रमाचेगटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या हस्ते सुरुवात.


नरेंद्र मेश्राम. 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशांनुसार हर घर तिरंगा 2025 कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 या हर घर तिरंगा" मोहीम आझादो का अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षी हर घर तिरंगा महोत्सव 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान खालील तीन टप्यात आयोजित करण्यात आला आहे.तर प्रथम टप्यात  2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2025 तिरंगा प्रेरित कलाकृतीने शाळेच्या भिती आणि फलक सजावट करणे. तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन, तिरंगा राखी तयार करणे, सैनिक आणि पोलिस कर्मचा-यांना तिरंगा राखी पाठविणे  टप्पा 2 मध्ये तिरंगा यात्रा (सायकल रेली, तिरंगा रैली 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट.पर्यंत टप्पा 3 मध्ये सर्व शाळामध्ये दिनांक 13,14 व 15 ऑगस्ट 2025 ला  सकाळ पाळीत ध्वजारोहन समारंभ आयोजित करण्यात यावे तसेच , विद्यार्थ्यांना सेल्फी विथ तिरंगा वेबसाइटवर फोटो अपलोड करण्यास प्रोत्साहित करन्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहे संतश्रेष्ठी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंतीबर्ष आहे. व  15 ऑगस्ट 2025 ला "गोकुळ अष्टमीस" संतश्रेष्ठी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची 750 वी जयंती असल्याने, सर्व शाळांनमधून 14 ऑगस्ट 2025 ला पसायदान म्हणण्यात येणार आहेतअसे सर्व उपक्रम साजरे करण्याबाबद शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के  माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला गोतारणे, गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड  यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात येत आहे. या तिरंगा रयालीचे  आयोजन लाल बहाद्दूर शास्त्री  शाळा व कनिष्ठ महाविद्यालय भंडारा च्या वतीने तिरंगा रॅली काढून भंडारा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली या विद्यालयाचे प्राचार्य सुनील खिलोटे,व्ही आर सी च्या अर्चना बेदरकर, डॉ. चोपराम गडपायले, विजयकुमार बांगडकर,सुनीता ढेंगे, सुनील करनकोटे, वाघाये,टिचकुले, यावलकर, गजबे, टेम्भूरकर, उदखेडे, वैद्ये, बन्सोड, मोहतुरे, तुमाने, पडोळे, पंचभाई, श्रद्धा,, कृतूजा, आणि मोठ्या संख्येने शिक्षक शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित  होते.

0 Response to "लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रमाचेगटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या हस्ते सुरुवात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article