-->
श्री संताजी महाविद्यालयात 'वृक्षबंधन' रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम

श्री संताजी महाविद्यालयात 'वृक्षबंधन' रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम


नरेंद्र मेश्राम
पालांदूर: येथील श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 'रक्षाबंधन' हा सण केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश देत 'वृक्षबंधन' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला
.
या उपक्रमांतर्गत, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वृक्षांना राख्या बांधून त्यांच्या संरक्षणाची शपथ घेतली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये झाडांबद्दल प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या संवर्धनाची भावना निर्माण करणे हा होता. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे किती महत्त्वाची आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः घरून राख्या तयार करून आणल्या होत्या. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश लांजेवार, , डॉ. राजेंद्र खंडाईत, प्रा. प्रमोद शेंडे,प्रा. संगीता सेलोकर श्रीमती जया कोडापे,  यांच्यासह इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. गायत्री कोडापे, कु. अंजली ढवळे ,कु कोमल हटवार कु.संध्या कांबळे, कु.रवीना नागोसे,प्रणय काटगाये,शुभम भोवते,यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाने रक्षाबंधनाचा पारंपरिक अर्थ जपतानाच पर्यावरणाच्या रक्षणाची एक नवीन दिशा दिली, ज्यामुळे महाविद्यालयाचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात 'वृक्षबंधन' रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article