हनुमान वार्ड, देसाईगंज येथे शहरी आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन – आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
बातमी संकलन
देसाईगंज :- ०१ ऑगस्ट २०२५
हनुमान वार्ड, देसाईगंज येथे आज शहरी भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा सुलभ व सशक्त करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या *शहरी आयुष्मान आरोग्य मंदिर* चे *उद्घाटन आमदार मा. श्री. रामदासजी मसराम* यांच्या हस्ते संपन्न झाले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शहरी भागातील गरीब, *गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा मोफत किंवा नाममात्र दरात मिळाव्यात,* यासाठी ही केंद्रे उभारण्यात येत आहेत. देसाईगंज शहरात हनुमान वार्डमधील हे केंद्र आता स्थानिक नागरिकांना आरोग्यविषयक विविध सेवा देणार आहे.
यावेळी त्यांनी स्थानिक समस्या आणि नागरीकांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले. तसेच, येत्या काळात आणखी आरोग्य केंद्रे सुरू करून देसाईगंज शहरास आरोग्यदृष्ट्या सक्षम बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे, तहसीलदार देसाईगंज श्रीमती.प्रीतीताई डूडूलकर, गट विकास अधिकारी श्रीमती प्रणाली खोचरे .तालुका आरोग्य अधिकारी डॉ आनंद जी ठीकरे,पॅरा मेडिकल वर्कर श्री. दिनकर संदोकर ,वैद्यकीय अधिकारी सावंगी डॉ .अशोक गहाणे,माजी नगर अध्यक्ष श्रीमती शालू ताई दंडवते , सागर वाढई,तसेच विविध शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर आमदार श्री. मसराम यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, "आरोग्य सेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क असून, शासनाच्या माध्यमातून अशा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे जनतेचे कर्तव्य म्हणून मी मानतो."
0 Response to "हनुमान वार्ड, देसाईगंज येथे शहरी आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन – आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें