धम्मचक्र प्रवर्तन ऐरणीवर असतांनाही प्रशासकीय उदासीनतेने गाठला कळस.......• महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?.
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक की आवाज"
नागपूर :- मागील वर्ष पाहू जाता, या वर्षीच्या मान्सुनची आक्रमकता आणि दुसरीकडे स्नान गृहे - तात्पुरत्या संडास बांधकाम उभारणीत दरवर्षी पेक्षा " निम्मी " होणारी "संडास बांधकाम " संख्येची कमतरता उडवेल प्रशासनाची कुंभकर्णी झोप...!
दिक्षा भूमी धम्म चक्र प्रवर्तन दिन पुर्वतयारी व्यवस्थेत संबंधित प्रशासन सूस्त - निर्धास्त , सात ते नऊ लाख अनुयायांना नाही उरला कुणी राजकीय आधार! तर
पालकमंत्री केवळ कोराडी मंदिर यात्रा तयारीत व्यस्त राहुन दिक्षा भूमी पेक्षा एक चतुर्थांश पेक्षाही कमी यात्रेकरूंना गोंजारण्याची राखती ख्यालीखुशाली - कोराडी मंदिर यात्रा व्यवस्थेवरकरडी नजर तर दिक्षा भूमी - धम्मदीक्षा दिन व्यवस्था बाबत सावत्र व्यवहार करीत असल्याचे लक्षात येते...
या वर्षीच्या 02 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांच्या संखेत मागील पांच वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे.
दरवर्षी होणारी प्रचंड गर्दी पाहू जाता मनपा प्रशासन परिसरात होणाऱ्या घाणीवर आणि त्यामुळे येणाऱ्या रोगराई वर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करुन मोठ्ठ्या प्रमाणात जवळपास 960 ते 1050 स्नानगृहे आणि संडास ची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी दरवर्षी नित्यनेमाने करायचे. तीही तोकड्या प्रयत्नांचा भाग ठरायचा. यापुर्वी त्या दरवर्षी खालील प्रमाणे , दीक्षाभूमी परिसरात 100, माता कचेरी परिसर 350, आयटीआय परिसर 250,
अशी उपरोक्त व्यवस्था मागील काही वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती , ती सुद्धा कमी पडायची. मग मोबाईल व्हॅन वर प्रशासन विसंबून रहाते, परंतु प्रचंड गर्दी मुळे या वहानांची ने- आण अशक्य होतं असल्याने ते केवळ पांढरे हत्ती ठरतात. थोडक्यांत संडास - स्नानगृहांची संख्या यापूर्वी च्या अनुयायांच्या गर्दीला अपूरी पडायची परंतु देशभरातून दिक्षा भूमी येणाऱ्या अनुयायांच्या संखेत मागील दोन तीन वर्षांत दुप्पटीने वाढ झाली असतांना तात्पुरते संडास उभारण्यात सुद्धा दिड पटीने १५०० ते १६०० च्या संख्येने त्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित असतांनाच जेल प्रशासनाने भलीमोठी कंपाऊंड वॉल कायमस्वरूपी पक्की भिंत बांधून टाकली आणि त्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या संडास बांधणी कामात प्रचंड अडथळा निर्माण झाला. दुसरीकडे आयटी आय परिसरात बांधकाम सुरू असल्याने तिथेही मागील संखेत संडास बांधकाम करण्यात घट होणार आहे. दिक्षा भूमी परिसरात होणाऱ्या गर्दी मुळे तिथे ही संडास उभारणी संखेत घट होईल. परिणामी अनुयायांच्या संडास स्नानगृहे वापर बाबत गैरसोईत प्रचंड वाढ होईल असे स्पष्ट संकेत आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अनुयायांच्या स्नान गृहे आणि संडास ( तात्पुरत्या स्वरूपात) वाढीव बांधकाम (अंदाजे १५०० ते १६०० यावर्षी करिता ) संखे साठी पर्यायी जागा उपलब्धता व्यवस्थेची पुर्व आखणी अद्यापही न झाल्यामुळे आम्ही जागरूक अनुयायी म्हणून आम्हाला चिंतेने ग्रासले असले तरी या सर्व बाबींची जबाबदारी ज्या प्रशासनाची आहे ते आयुक्त आणि त्याचे अधिनस्त जिल्हाधिकारी गाढ निद्रेत असल्याचे जाणवते. नागपूर म.न.पा. प्रशासनावर सर्व जबाबदाऱ्या सोपवून आपली किमान आढावा घेण्याची ही प्रणाली तसदी घेतांना दिसत नाहीत. कारणं कारागृह प्रशासन, आयटी आय व दिक्षा भूमी परिसराच्या आसपासच्या संस्था आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने दट्ट्या दिल्या शिवाय जुमानत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व आसपासच्या संलग्न संस्था ची तातडीने बैठक बोलावून त्या-त्या संस्था परिसरात तात्पुरती स्नानगृहे आणि संडास बांधकाम उभारणी करणे सक्तीचे / अनिवार्य केले पाहिजे. तसेच पाऊस आल्यावर लगतचे हे सर्व संस्था परिसर डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासह अनुयायांकरिता खूले करुन देण्याचे आदेश निर्गमित केले पाहिजे. त्यामध्ये,१)लक्ष्मी नगर चौक ते रहाटे काॅलनी रस्ता २) बजाजनगर चौक ते सेंटर पाॅईंट पर्यंत ३) मधला नीरी ते काची पूरा चौक पर्यंत ची सर्वं शासकीय - निमशासकीय - केंद्रीय कार्यालये अनुदानित - विनाअनुदानित व लिझवर वापरास दिलेल्या तमाम संस्थांचा समावेश सक्तीचा करावा. ही सक्ती आणि अनिवार्यता केवळ आणि केवळ आयुक्त आणि जिल्हा प्रशासन आणिबाणी परिस्थितीनुरूप अवलंब करू शकतात. परंतु तसे पाऊल उचललेले अद्याप तरी दिसून आले नाही. आपले घोंगडे मनपा. प्रशासनावर फेकून म.न.पा. ला बळीचा बकरा बनविण्याचा चंग तर बांधला नाही नां?. अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. विधानसभेच्या अधिवेशनात याविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर तरी संबंधितांनी या संवेदनशील विषयाला गांभीर्याने घेणे अपेक्षित होते. परंतु पुर्वतयारी आढाव्याची एकही आढावा बैठक या उच्चतम अधिकाऱ्यांनी वा उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घेतल्याचे आमच्या ऐकिवात नाही. महाराष्ट्र भर कर्तबगारी टेंभा मिरवणारे पालकमंत्री याबाबतीत प्रचंड उदासीन असतात त्यांचें सारे लक्ष याच कालावधीत होणाऱ्या जगदंबा देवी कोराडी मंदिर यात्रेच्या तयारीत असते. त्यातून उसंत न मिळाल्याने त्यांचे दिक्षा भूमी - धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष होते. हा पुर्वानुभव आहे. आणि त्यांचे आका मुख्यमंत्री यांना उभा महाराष्ट्र सांभाळायचा असल्याने आपल्या घराशेजारी आणि स्व-मतदार संघात असणाऱ्या दिक्षा भूमीवर येणारे दूरदुरचे अनुयायी आणि लक्ष्मी नगरसह आसपासच्या स्थानिक रहीवासीयांना धम्म चक्र प्रवर्तन दिन कालावधी मध्ये अपुऱ्या संडास (तात्पुरत्या ) बांधणी मुळे होणारा त्रास का बरं लक्षांकीत होऊ नये.?.हे न उलगडणारे कोडे आहे. *या दोन जबाबदार प्रमुखांना आढावा घेण्याची उसंत च् नसेल तर सुस्तावलेल्या अजगरी प्रशासकीय व्यवस्थेकडून कायं अपेक्षा ठेवणारं आहोत?. सट च्या सट च् निकामी ठरतो की काय?.ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळीच सजग होऊन ढेपाळलेल्या यंत्रणेतील उणीवा दूर करण्यासाठी, अत्यल्प शिल्लक अवधी पाहू जाता आपली यंत्रणा दरवर्षी प्रमाणे कार्यान्वित करावी. कारणं ह्या सक्षम यंत्रणेच्या जोरावरच आजतागायत चे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळे दिमाखात साजरे होत आलेले आहेत. हे या ठिकाणी मान्य केले नाही तर ती " कृतघ्नता " ठरेल. याचीही आम्ही जाणीव ठेवूने आहोत.
व्यवस्थापन व्यवस्थेवरील शब्द झोंबणारे असतीलही मात्र वस्तुस्थिती विदारक आहे. रोगराई प्रादुर्भाव झाला तर नागपूरचे दवाखाने कमी पडतील हा इशारा दिल्या वाचून आमच्याने राहवत नाही.कारणं गेली अनेक वर्षं आम्ही दिक्षा भूमी वर ती जबाबदारी पार पाडली आहे . प्रशासनाला सहकार्य केले आहे.
आतातरी शासन - प्रशासन खडबडून जागे झाले तरी अनर्थ टळला जाऊं शक्यतो. कुणावरही दोषारोपण करण्याचा मानस नाही. करीता हा शब्द प्रपंच....!
उचित वाटतं असल्यास शासन- प्रशासना पर्यंत पोहोचते करण्यासाठी सर्व संबंधित माहिती आपल्या लोकप्रिय दैनिकात आणि युट्यूब च्या माध्यमातून प्रसारित करण्याची तसदी घ्यावी. जेणेकरून प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे प्रशासनाला सहकार्य होईल. ही अभिलाषा...! मागिल १ जुलै पासून संविधान चौक नागपूर येथे , भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल , महिला ससक्तिकरण संघ , भिक्खू आणि भिक्खुणी संघ व विविध सामाजिक , धार्मिक व आंबेडकरी संघटना व्दारे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि दिक्षाभुमी सौंदर्यिकरण त्वरित करण्यात यावे यासाठी संविधान चौक येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे , आज या आंदोलनाला ३४ दिवस होत आहेत . जनतेचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद ही मिळत आहे . पण प्रशासनाच्या वतीने कोणीही या आंदोलनाला भेट दिली नाही .
शब्दांकन - विनय ढोके ( बौद्ध )
धम्मप्रचारक - भारतीय बौद्ध महासभा पुर्व विभाग नागपूर संस्कार उपाध्यक्ष .
.
0 Response to "धम्मचक्र प्रवर्तन ऐरणीवर असतांनाही प्रशासकीय उदासीनतेने गाठला कळस.......• महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?."
एक टिप्पणी भेजें