भंडारा येथे बंजारा तांडा प्रमुख (नायक ) तथा उपप्रमुख (कारभारी ) यांची एकमताने निवड.
सोमवार, 4 अगस्त 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम.
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- स्थानिय जिल्हा परिषद व पंचायत समिती सहकारी संस्था येथे बंजारा (गोर बांधव ) एकत्रित जमले होते . आपल्या समाजाच्या संस्कृती ची ओळख व्हावी . जपणूक व्हावी . सन उत्सव एकत्रीत साजरे करता यावे . सामाजाच्या सर्व लोकांना समाज भिमूक कार्यक्रम एकत्रीत करता यावे व बंजारा बाधवाना सामाजिक व प्रशासिक न्याय मिळावा तद्वतच समाजाचा आधार लाभावा . करीता नवीन तांडा प्रमुख व उपप्रमुख नेमन्याचे या सभेत ठरले त्या अनुषंगाने सभेत तांडा प्रमुख (नायक) म्हणून विजय जाधव यांची निवड करण्यात आली तर उपप्रमुख ( कारभारी ) म्हणुन गजानन राठोड यांची निवड एकमताने करण्यात आली.
या निवड प्रक्रियेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भंडारा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शंकर बी.राठोड हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी नायक संतोष जाधव माजी कारभारी रविभाऊ राठोड उपस्थित होते . यावेळी संत सेवालाल महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकमाजी नायक संतोष जाधव यांनी तांडा प्रमुख( नायक )व उपप्रमुख कारभारी यांची तांड्या करीता गरज असल्याचे सविस्तर मौल्यवान शब्दात मार्गदर्शन केले तर रविभाऊ राठोड यांनी समाज कसं असावं याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी शंकर बी. राठोड यांनी समाजात कसं वागलं पाहिजे. आपली भूमिका कशी असावी.सर्व सांगून बंजारा समाजास अमृतडोज पाजले. समाज उद्धारासाठी सामाजिक बाधिलकीने कर्तव्य जोपासले पाहिजे व संघटित कार्य करून सर्वांच्या हितासाठी सहकार्याची भावना जोपासण्याची आवश्यकता असल्याचे अतिशय गोड शब्दात मौल्यवान विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप भाऊ राठोड यांनी केले. तर आभार प्रदर्शन नंदकिशोर जाधव यांनी सादर केले.
सदर सभेला गोर बंजारा समाजातील शंकर बी.राठोड,
प्रा.संतोष जाधव, रवि राठोड, नंदू जाधव, कोमलसिंग राठोड, दिनकर राठोड,पंकज जाधव, दिलीप राठोड, दारासिंग चव्हाण दत्ता जाधव,यशपाल राठोड, हितेश चव्हाण, संदीप राठोड हरिश्चंद्र पवार,
प्रदीप पवार,किरण चव्हाण, विनोद राठोड,गोपाल राठोड,
सुनील राठोड, नितेश राठोड
अर्जुन राठोड, प्रतीक राठोड
विजय जाधव, गजानन राठोड आदींचे सहकार्य लाभले.
0 Response to "भंडारा येथे बंजारा तांडा प्रमुख (नायक ) तथा उपप्रमुख (कारभारी ) यांची एकमताने निवड. "
एक टिप्पणी भेजें