वैनगंगा ते बैरंगेश्वर मंदिर कावड यात्रा... कावड यात्रेत बीटीबी तर्फे शिवभक्तांचे पुष्पगुच्छाने सन्मान.
सोमवार, 4 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवित्र श्रावण मासाच्या उत्साहात परंपरेने बैरंगेश्वर मंदिर येथे वैनगंगेचे जल कावडीच्या रूपाने वाजत गाजत आणून शिवभक्तांनी शिवाभिषेक केला. अत्यंत पावित्र्यपूर्ण वातावरणात बीटीबी व हिंदूरक्षामंचच्या वतीने कावडधारांचे पुष्पवृष्टी करीत सन्मान पुरविण्यात आला. बीटीबी चौकात सर्व उपस्थिताना तृष्णा भागविण्यात आली.
भारतीय संस्कृती सण उत्सवात आनंद शोधत जीवन सुखमय करते. कोणताही भेदभाव न करता सर्व शिवभक्त एकाच मार्गाने शिवापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत श्रावणमास आनंदाने पार पाडतात. बीटीबीच्या काही सदस्यांनी महादेवाला प्रिय असणारा पिवळा रंगाचा सदरा घालून पारंपारिक नृत्य सादर केले. यातून शिवभक्तांना आनंद पुरविला. बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी शिवभक्तांच्या सेवेत स्वतःला समर्पित करून त्यांचा उत्साह वाढविला.
0 Response to "वैनगंगा ते बैरंगेश्वर मंदिर कावड यात्रा... कावड यात्रेत बीटीबी तर्फे शिवभक्तांचे पुष्पगुच्छाने सन्मान."
एक टिप्पणी भेजें