अंधश्रद्धा सोडा, नाते विज्ञानाशी जोडा - प्राचार्य राहूल डोंगरे( लोहारा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिपादन )
रविवार, 31 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- अंधश्रद्धा समाजाला लागलेली कीड आहे.खऱ्याला खरे मानणे आणि खोट्याला खोटं आहे,असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन होय.तेव्हा अंधश्रद्धा सोडा आणि नाते विज्ञानाशी जोडा हाच राष्ट्राच्या प्रगतीचा आरसा आहे.असे प्रतिपादन लोहारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक प्राचार्य राहुल डोंगरे यांनी अंधश्रद्धेविरोधात समाजप्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. नितीनकुमार राठोड (पोलीस निरीक्षक, आंधळगाव), मा. सविता अरविंद ठाकरे सरपंच, मा. हरीश डोंगरे,पोलीस पाटील, मा. सुरेंद्र भागडकर तंटामुक्ती अध्यक्ष , देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनिल बांडेबुचे, राजुभाऊ चामट सर, अनिल भुसारी सर, कुमरे सर यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आपल्या प्रबोधनपर भाषणात प्राचार्य राहुल डोंगरे यांनी स्पष्ट केले की—जगात भूत, भानामती, जादूटोणा वा चमत्कार असे काहीही अस्तित्वात नाही. भोंदू बाबा व खोटे साधू समाजातील निरपराधांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करतात. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली घातक कीड असून ती अज्ञान आणि भीती वाढवते, तसेच प्रगतीत अडथळा ठरते.
यावेळी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करून अंधश्रद्धांचा भंडाफोड करण्यात आला. तांदुळाने भरलेला तांब्याचा लोटा पेचकसने उचलणे, जळता कापूर खाऊनही अपाय न होणे, कानावर ठेवलेली चिट्ठी वाचून दाखवणे, मंत्राने नव्हे तर विज्ञानाच्या साहाय्याने यज्ञ पेटविणे, निंबूतून केस काढण्याचा भ्रम फोडणे तसेच तीर्थ देण्याच्या अंधश्रद्धेचे वैज्ञानिक स्पष्टीकरण अशा प्रयोगांनी उपस्थितांना पटवून देण्यात आले कीघ चमत्कार नावाची गोष्ट नसून हे सर्व विज्ञाननिष्ठ प्रयोग आहेत.
या प्रसंगी प्राचार्य राहूल डोंगरे यांनी ठाम संदेश दिला :
“अंधश्रद्धा सोडा – नाते विज्ञानाशी जोडा. विवेक जागवा आणि विज्ञाननिष्ठ समाज उभारा!”
गावकऱ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाजजागृतीचा ठोस पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनीही विज्ञानाधिष्ठित जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मंडळाने व ग्रामस्थांनी प्राचार्य राहुल डोंगरे व उपस्थित अतिथी व गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
0 Response to "अंधश्रद्धा सोडा, नाते विज्ञानाशी जोडा - प्राचार्य राहूल डोंगरे( लोहारा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिपादन )"
एक टिप्पणी भेजें