उस्माननगर चौकात मुस्लिम बांधवांच्या कमेटीतर्फे आमदार चिखलीकर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
सोनू क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उस्माननगर :- कंधार / लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि मन्याड खोऱ्याचा वाघ आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उस्माननगर येथील उध्दासी बुवा चौकात काजी साजीदभाई गुत्तेदार यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी मुस्लिम समाजाच्या वतीने यथोचित शाल श्रीफळ, पुष्पमाला अर्पण करून सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. कंधार लोहा
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात
मतदार व कार्यकर्ते यांना भेटून सत्कार स्वीकारण्यासाठी कंधार कडे जाताना उस्माननगर येथील चौकात अभिष्टचिंतन
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चौकात येताच फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात
जंगी स्वागत करण्यात आले यावेळी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, प्रणिताताई चिखलीकर ढगे, यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी येथे नव्यानेच काजी साजीदभाई गुत्तेदार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कमेटीची स्थापन करण्यात आले आहे. हजरत अबूबकर सिदिख रजि अल्लाहू अनहुमा कमेटीच्या वतीने पुष्पहार शाल घालून सत्कार करण्यात आला, यावेळी कमेटीचे प्रमुख
बाबू मौलासाहब पिंजारी, शेख जमिलसाहब, शेख नसिरुद्दीन, आदमनकर शेरूमियाँ, चौधरी मुखीद, हाफीज गौस, पिंजारी बाबू भाई पानपट्टीवाले, शेख इब्राहिम पिंजारी मुन्तलीब उस्माननगरसलिम टेलर, शेख हाबीबभाई सेवानिवृत्त होमगार्ड मियां खुरेशी अमीन आदमनकर इलियास चाऊस शेख फयाज यांच्या सह कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले.
0 Response to "उस्माननगर चौकात मुस्लिम बांधवांच्या कमेटीतर्फे आमदार चिखलीकर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन."
एक टिप्पणी भेजें