-->
श्रावणबाळ , व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या: वंचित बहुजन आघाडी ,मुख्यमंत्री यांना निवेदन.

श्रावणबाळ , व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या: वंचित बहुजन आघाडी ,मुख्यमंत्री यांना निवेदन.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- राज्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय अल्प मानधन मिळते ते मानधन दर महिन्याला न मिळता  3_3  महिन्याने भेटत असते त्यामुळे ते त्यांचे जीवन जगणं असह्य होते त्यामुळे तसेच त्यांचे मानधन अतिशय अल्प आहे त्यामुळे त्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावे व ते मानधन नियमित दर महिन्याला देण्यात यावी श्रावणबाळ योजना , संजय गांधी निराधार योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभार्थ्यांना फार मोठे त्रास सहन करावा लागतो जर दर महिन्याला हे मानधन जर मिळाले तर त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय योग्य आणि चांगल होईल करिता दर महिन्याला त्यांचे मानधन देण्यात आले व त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात येत आहे
या पद्धतीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी  मार्फत पाठविण्यात आली आहेत निवेदन देताना माजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले,माजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष राहुल गजभिये, राधेश्याम कावले,अजित गजभिये, नितीन गजभिये, अमित वैद्य, मनोज खोब्रागडे, आकाश गजभोये,अरुण खंडाते, यादवराव गणवीर, गणेश गजभिये ,श्रीकांत नागदेव, मुस्ताक पठाण व इतरही कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते

0 Response to "श्रावणबाळ , व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या: वंचित बहुजन आघाडी ,मुख्यमंत्री यांना निवेदन. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article