एस एन मोर महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
मंगलवार, 19 अगस्त 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर:- तुमसर येथे गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकताच एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, कनिष्ठ महाविद्यालय व तुमसरातील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील या अभियानाचे समन्वयक हेमंत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्स या रोगाबद्दलची कारणे, प्रसार, उपाययोजना व खबरदारी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आजच्या काळातील तरुणांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे प्रभारी डॉ. जयंत कुमार मस्के हे होते. डॉ. मस्के यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रजनी गायधने यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर राजेश दिपटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक ज्ञानेश्वर जांभुळे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "एस एन मोर महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें