खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते मुरमाडी येथे अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन
शनिवार, 16 अगस्त 2025
Comment
न्यूज नेटवर्क
गडचिरोली :- 15 ऑगस्ट 2025
खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे* यांच्या हस्ते संपन्न झाले.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गावपातळीवरच पुरेशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीकोनातून खासदार डॉ. किरसान यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून विविध गावांमध्ये अभ्यासिका उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुरमाडी येथे उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिकेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
या वेळी खासदार डॉ. किरसान म्हणाले की, “अभ्यासिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होऊन सुसज्ज सुविधा विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण मिळेल.”
या सोहळ्याला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोडघरे, सरपंच भोगेश्वर कोडाप, उपसरपंच यशवंत डोईजड, ग्रामसेविका विजया आत्राम, तसेच गिरधर बोरकर, मनोहर भोयर, चंद्रभान नैताम, राजू भोयर, दिवाकर उरकुडे, मधुकर कोहपरे, लुमाजी भोयर, विकास तिवाडे, रमेश भंगर, अशोक कोहपरे, आनंदराव भुसारी, मुकेश आवारी, जीवन कोहपरे, दुर्योधन उरकुडे, जगदीश बांबोळे, कैलाश आवारी, जितेंद्र बांबोळे, निवृत्त कोहपरे, प्रदीप भोयर, रोशन आवारी, दिलीप भुसारी, प्रदीप मडावी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, स्वप्नील बेहरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते मुरमाडी येथे अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन"
एक टिप्पणी भेजें