-->
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण महोत्सव श्री पंचवतार उपहार सोहळा व भव्य महानुभाव पंथीय संमेलन

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण महोत्सव श्री पंचवतार उपहार सोहळा व भव्य महानुभाव पंथीय संमेलन


"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी

नागपूर :- अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर खापरी, कवठा, खैरी, खसाळा, भिलगाव टोली, मासळ, ग्रामस्थाच्या वतीने श्री चक्रधर स्वामी ८०५ .वा अवतरण सोहळा.कविवर्य सुरेश भट्ट सभागृह रेशीम बाग नागपूर येथे कवीश्वर कुलाचार्य प.पू. महंत कारंजेकर बाबा म.अमरावती अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचे अध्यक्ष खाली कार्याध्यक्ष उपाध्य कुलाचार्य प.पू. महंत श्री बिडकर बाबा.रणाईचे  व उद्घाटक म्हणून मा.ना. श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते व महामार्ग परिवहन भारत सरकार तसेच.विशेष अतिथी मा.ना. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.चद्रंरशेखरजी बावनकुळे महसूल व पालकमंत्री (मा.रा.) नागपूर उपाध्य प.पु. श्री ज्ञानबास बाबा शास्त्री मकरधोकळा आचार्य प्रवर पपू महंत श्री.आंबेकरबाबा जाळीचा देव कवी कुलाचार्य प.पू. महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री माहूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिनांक ३१ अगस्त २०२५ ,रोज रविवारला श्रीकृष्ण मंदिर मासळ येथून सकाळी ७:४५ वा.पालखीला सुरुवात होईल. श्री दत्त मंदिर टोली ८:३० वा.श्री दत्त मंदिर खसाळा ९:१० वा.नाका नंबर दोन येथून सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे पालखी जाईल व भव्य कार्यक्रम संपन्न होईल तरी सर्व संत,महंत,भीक्षूक,वासनिक,भावीक व ग्रामस्थ यांना उपस्थित राहण्याचे आव्हान कार्यक्रम आयोजकांनी केले आहे.

0 Response to "भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण महोत्सव श्री पंचवतार उपहार सोहळा व भव्य महानुभाव पंथीय संमेलन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article