तळा येथे प्रा दिवाकर कदम व सौ नम्रता मुतंगे यांचा सेवापूर्ती समारंभ भावनिक वातावरणात संपन्न .
रविवार, 24 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
तळे/रायगड :- तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा दिवाकर धोंडू कदम व गो. म. वेदक विद्यामंदिरच्या आदरणीय शिक्षिका सौ. नम्रता नागप्पा मुतंगे यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी, अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पत्रकार पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेशशेठ देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य किरणशेठ देशमुख, डॉ सतिश वडके, दिपकशेठ कोटीया, राजू सप्रे, सौ देशमुख, सौ सप्रे, माजी प्राचार्य डॉ राजेंद्र कांकरिया, प्राचार्य डॉ नानासाहेब यादव, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, सचिन भाटे, सत्कारमूर्तींचे नातेवाईक, मित्र, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विद्यामंदिर, गो म वेदक विद्यामंदिर, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, माजी सेवक शंकर वाघमारे, विनोद कोलवणकर, जानराव सर, प्रा दत्ता कुंटेवाड, डॉ राजेंद्र कांकरिया, पत्रकार पुरुषोत्तम मुळे, मित्र व नातेवाईकांच्या वतीने प्रा दिवाकर कदम व सौ नम्रता मुतंगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रा दिवाकर कदम ५ सप्टेंबर २०११ रोजी द ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात रुजू होऊन १४ वर्ष शैक्षणिक सेवा केली. त्यांनी २ विषयात पीएच डी केली असून अन्य क्षेत्रातही पदव्या प्राप्त केल्या आहेत.
सौ नम्रता मुतंगे १९ ऑगस्ट १९८६ रोजी गो म वेदक विद्यामंदिर तळा येथे रुजू होऊन त्यांनी ३९ वर्ष शैक्षणिक सेवा पूर्ण केली. या दोन्ही सत्कारमूर्तीनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या अध्यापनशैलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच जीवनमूल्यांचे धडेही दिले.
सेवापूर्ती समारंभात विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी दोन्ही शिक्षकांच्या समर्पणाची, प्रामाणिकपणाची व विद्यार्थ्यांविषयी असलेल्या कळकळीची दखल घेतली. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका अत्यंत मोलाची असते, आणि कदम सर व मुतंगे मॅडम यांनी ती भूमिका यशस्वीपणे पार पाडली,” असे प्राध भगवान लोखंडे, रोहित भागवत, सौ जयश्री मचे, प्रा सर्जे व्ही बी, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, प्राध्यापिका तृप्ती थोरात, प्रकाश गायकवाड, प्रा दत्ता कुंटेवाड, डॉ राजेंद्र कांकरिया, यशश्री मुतंगे, राजू सावंत, पाटील सर, मारुती शिर्के गुरुजी, पुरुषोत्तम मुळे, मंगेशशेठ देशमुख, चंद्रकांत रोडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा दिवाकर कदम व सौ. नम्रता मुतंगे यांनी सत्काराला उत्तर दिले. समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ नानासाहेब यादव तर निवेदन प्रा पाटील एन सी यांनी केले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
0 Response to "तळा येथे प्रा दिवाकर कदम व सौ नम्रता मुतंगे यांचा सेवापूर्ती समारंभ भावनिक वातावरणात संपन्न ."
एक टिप्पणी भेजें